---Advertisement---

…तर आशिया इलेव्हन विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन संघांचे सामने होऊ शकतात रद्द

On: मंगळवार, मार्च 10, 2020 5:02 PM
---Advertisement---

या महिन्यात बांगलादेश क्रिकेट बोर्ड आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश (Asia XI vs World XI) या संघामध्ये दोन आंतरराष्ट्रीय टी20 सामने आयोजित करणार आहे. मात्र आता त्या सामन्यांवर कोरोना व्हायरसची टांगली तलवार आहे.

सध्या जगभरात कोराना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण आहे. त्याचा परिणाम अनेक खेळांच्या स्पर्धांवरही पडत आहे.

नुकतेच cricfrenzy.com ने दिलेल्या वृत्तानुसार बांगलादेश क्रिकेट बोर्ड आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश संघातील सामने रद्द करु शकतात. एका बांगलादेश क्रिकेट बोर्डच्या अधिकाऱ्याने सांगितले की ‘हो, हे सामने रद्द होऊ शकतात. पण अजून काहीही निश्चित झालेले नाही.’

तसेच सध्या झिम्बाब्वेचा संघ बांगलादेश दौऱ्यावर आला आहे. या दरम्यान बांगलादेश विरुद्ध झिम्बाब्वे संघात होणाऱ्या टी२० मालिकेची बरीच तिकिटे न विकण्याचाही निर्णय बांगलादेश क्रिकेट बोर्डाने घेतला आहे. ‘झिम्बाब्वेविरुद्धच्या दोन टी -२० सामन्यादरम्यान आम्ही एका व्यक्तीला फक्त एकच तिकिट विकायचा निर्णय घेतला आहे, ’’ असे अधिकाऱ्याने सांगितले.

बांगलादेश क्रिकेट बोर्ड आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश संघातील पहिला सामना 18 मार्चला आणि दुसरा सामना 21 मार्चला शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियम (Sher-e-Bangla National), ढाका (Dhaka) येथे आयोजित करणार आहे. पण आता ही मालिका होणार का हे पहावे लागणार आहे.

आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश संघातील २ टी२० सामन्यांच्या मालिकेचे आयोजन बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीब-उर-रहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्त केले जात आहे.

या मालिकेसाठी आशियाई एकादश संघात विराट कोहलीसह 6 भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.  यात कोहलीसह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, शिखर धवन, रिषभ पंत आणि केएल राहुल या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तसेच विश्व एकादश संघात फाफ डू प्लेसिस, ख्रिस गेस, जॉनी बेअरस्टो अशा खेळाडूंचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

खेळाडूला नाही तर चक्क अंपायरला दुखापतीमुळे पडावे लागले सामन्यातून बाहेर

दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ खेळाडू वाढवणार भारताचे टेंशन

दक्षिण आफ्रिका संघाला कोरोना व्हायरसची भीती, भारत दौऱ्यात टाळणार हस्तोंदलन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---