18 व्या एशियन गेम्समध्ये धावपटू मनजीत सिंगने मंगळवारी (28 आॅगस्ट) भारताला दिवसातील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. हे भारताचे यावर्षीचे या स्पर्धेतील एकूण 9 वे सुवर्णपदक ठरले.
त्याने पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच याच शर्यतीत भारताच्याच जीन्सन जॉन्सनला रौप्यपदक मिळाले आहे.
या शर्यतीत मनजीतने 1 मिनिट 46.15 सेकंद वेळ नोंदवली. तर जॉन्सनने 1 मिनिट 46.35 सेकंदाची वेळ नोंदवली. त्याचबरोबर कतारच्या अब्दुल अबुबाकेरने 1 मिनिट 46.38 सेकंदाची वेळ नोंदवत कांस्यपदक मिळवले.
1951 नंतर पहिल्यांदाच पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत एशियन गेम्समध्ये भारताला सुवर्ण आणि रौप्यपदक मिळाले आहे. 1951 मध्ये रणजीत सिंग यांना सुवर्णपदक तर कुलवंत सिंग यांना रौप्यपदक मिळाले होते.
त्याचबरोबर एशियन गेम्समध्ये 800 मीटर शर्यतीत एकाचवेळी दोन पदके मिळवण्याची ही तिसरी वेळ आहे. 1951 मध्ये रणजीत आणि कुलवंत यांच्यानंतर 1962 मध्ये दलजीत सिंग यांनी रौप्यपदक आणि अम्रित पाल यांनी कांस्यपदक मिळवले होते.
भारताने अॅथलेटिक्समध्ये आत्तापर्यंत 10 पदके मिळवली आहेत. यात 3 सुवर्णपदके आणि 7 रौप्यपदके मिळवली आहेत.
Thanks #ManjitSingh & #JinsonJohnson for that amazing result, #India celebrates #AsianGames2018 #EnergyOfAsia
@ioaindia @IndiaSports @Media_SAI @NeelamKapur
PC- @rahuldpawar pic.twitter.com/F1UdwLJlxK
— Athletics Federation of India (@afiindia) August 28, 2018
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्स: युट्युबवरुन गिरवले भालाफेकचे धडे, मिळवले सुवर्णपदक
–एशियन गेम्स: भारताच्या महिला, पुरुष संघाना तिरंदाजीत रौप्यपदक
–एशियन गेम्स: पीव्ही सिंधूचे ऐतिहासिक सुवर्ण हुकले, रौप्यपदकवार मानावे लागले समाधान