---Advertisement---

एशियन गेम्स: भारताला ब्रिज प्रकारात पुरूष दुहेरीत सुवर्णपदक

On: शनिवार, सप्टेंबर 1, 2018 4:28 PM
---Advertisement---

इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताच्या प्रणब बरधन आणि शिभनाथ सरकार यांनी ब्रिज या प्रकारात पुरूष दुहेरीत सुवर्णपदक पटकावले आहे.

६० वर्षीय बरधन आणि ५६ वर्षीय सरकार यांनी अंतिम फेरीच्या या सामन्यात ३८४ गुण मिळवले. यामध्ये चीनच्या यांग लिक्सिन आणि चेन गांग यांनी ३७८ गुण मिळवत रौप्यपदक तर इंडोनेशियाच्या हेंकी लसुट आणि फ्रेडी एडी यांना कांस्यपदक मिळाले. त्यांनी ३७४ गुण मिळवले होते.

तसेच यामध्ये सुमित मुखर्जी आणि डेबाब्राता मुजुमदार या अजून एका भारतीय जोडीचा समावेश होता. पण ते ३३३ गुण मिळवत नवव्या स्थानावर राहिले.

या स्पर्धेत ब्रिजमध्ये भारताचे हे पहिले सुवर्ण आहे तर पुरूष संघ आणि मिश्र संघाने कांस्यपदक मिळवले आहे.

ब्रिजचा समावेश पहिल्यांदाच एशियन गेममध्ये करण्यात आला आहे.

भारताने आतापर्यंत ६८ पदके मिळवली असून त्यात १५ सुवर्ण, २४ रौप्य आणि २९ कांस्य पदकांचा समावेश आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

भारताने मिळवली एशियन गेम्सच्या इतिहासातील सर्वाधिक पदके

वॉचमनच्या मुलाची झाली आशिया कपसाठी टीम इंडियात निवड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment