दक्षिण कोरियाच्या सन ह्युंग मिनने जर एशियन गेम्समध्ये पदक नाही मिळवले तर त्याला दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करावे लागणार आहे. तसेच त्याला प्रीमियर लीगला ही मुकावे लागणार आहे. हे १८वे एशियन गेम्स १८ ऑगस्टपासून जकार्तामध्ये सुरू होत आहे.
टोटेनहॅम हॉटस्परचा फॉरवर्ड सनने ऑलिंपिक किंवा एशियन गेम्समध्ये एकही पदक जिंकले नाही तर त्याला २१ महिने मिलिट्रीमध्ये काम करावे लागणार आहे. सध्या प्रीमियर लीग सुरू आहे तरीही हॉट्सपरने त्याच्या या फुटबॉलपटूला खेळण्यास होकार दिला आहे.
२६ वर्षीय सनने प्रीमियर लीगमधील ९९ सामन्यात ३० गोल केले आहे. असा करणारा तो आशियातील पहिलाच फुटबॉलपटू आहे. २०१०मध्ये राष्ट्रीय संघात पदार्पण केल्यावर त्याने ७० सामन्यात २३ गोल केले आहेत.
रशियात झालेल्या फिफा विश्वचषकात त्याने ३ सामन्यांमध्ये २ गोल केले. तसेच तो २०१४च्या विश्वचषकातही खेळला होता. यामध्ये त्याने १ गोल केला होता.
सनने जूलै महिन्यातच टोटेनहॅमसोबत ५ वर्षाचा करार केला आहे.
🇰🇷 Sonny will now link up with South Korea for the Asian Games.
Good luck, Sonny! 👍 pic.twitter.com/dlZfOlBI8C
— Tottenham Hotspur (@SpursOfficial) August 11, 2018
एशियन गेम्स ही फिफाने आयोजित केलेली स्पर्धा नसून फुटबॉल क्लब्सना खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामन्यांत सोडण्याची ताकीद नसते.
मागील एशियन गेम्सला सनला मुकावे लागले कारण बायेर लेवाकुझी या जर्मन फुटबॉल क्लबने त्याला मनाई केली होती. परत एकदा असे होऊ नये म्हणून त्याला ही ताकीद देण्यात आली.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–रियल माद्रिदला पराभूत करत अॅटलेटिको माद्रिदने पटकावले युरो सुपर लीगचे विजेतेपद
–टीम इंडियाने वाहिली अजित वाडेकरांना श्रद्धांजली