---Advertisement---

एशियन गेम्स: भारतीय महिला स्क्वॉश संघाला मानावे लागले रौप्यपदकावर समाधान

On: शनिवार, सप्टेंबर 1, 2018 6:38 PM
---Advertisement---

इंडोनेशियात सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये भारतीय महिला स्क्वॉश संघाला हॉंग कॉंग विरूद्धच्या सामन्यात पराभूत झाल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. एशियन गेम्समधील भारताचे हे सलग दुसरे रौप्यपदक आहे.

जोशना चिनप्पा, दिपिका पल्लिकल, कुरूविल्ला सुनयना आणि तन्वी खन्ना यांचा या भारतीय संघात समावेश होता. यावेळी सुनयना त्झे लोक हो हिच्याकडून आणि जोशना हॉंग कॉंगच्या अॅनी अयु कडून पराभूत झाली.

पहिला सामना हा जागतिक क्रमवारीत ८८व्या स्थानावर असलेल्या सुनयनाचा ५१व्या स्थानावर असणाऱ्या होसी होता. तसेच प्रतिस्पर्धीला अडथळा निर्माण केल्यामुळे तिला ताकिद देण्यात आली होती. यावेळी ती ८-११, ६-११, १२-१०, ३-११ अशी पराभूत झाली.

जोशनाला सामना जिंकण्याची खूप आवश्यकता होती. जागतिक क्रमवारीत १६व्या क्रमांकावर असणाऱ्या जोशनाला ही अॅनी विरुद्ध ३-११, ९-११, ५-११ असे पराभूत व्हावे लागल्याने सुवर्ण पदकाच्या आशा संपुष्टात आल्या.

भारताचे हे या स्पर्धेतील स्क्वॉशचे पाचवे पदक आहे. जोशना आणि दिपिका यांनी महिलांच्या एकेरीत, सौरव घोसालने पुरूष एकेरीत आणि पुरूष संघाने कांस्यपदक मिळवले होते.

भारतीय स्क्वॉश संघाने प्रशिक्षक सायरस पोचा यांच्या प्रशिक्षणाबाबत निराशा व्यक्त केली. त्यामुळे त्यांनी उत्कृष्ठ विदेशी प्रशिक्षकाची मागणी केली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: पाकिस्तानला हरवत भारतीय पुरूष हॉकी संघाने पटकावले कांस्यपदक

एशियन गेम्सच्या बक्षीस रकमेतून घराची करणार डागडुजी- द्युती चंद

एशियन गेम्स: बॉक्सिंगमध्ये अमित पांघलला सुवर्णपदक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment