पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) अनुभवी फिरकीपटू आसिफ आफ्रिदीला भ्रष्टाचारविरोधी कलमांतर्गत निलंबित केले आहे. या 35 वर्षीय फिरकीपटूने 35 प्रथमश्रेणी, 42 लिस्ट ए आणि 65 टी20 सामने खेळले आहेत. आसिफ आफ्रिदीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. आफ्रिदी नॅशनल टी20 चषक स्पर्धेत खैबर पख्तूनख्वा संघाचा भाग आहे. 31 ऑगस्ट रोजी त्याने शेवटचा सामना खेळला होता. आसिफ हा गोलंदाजी अष्टपैलू असून, त्याच्या नावावर प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये शतक आहे.
पाकिस्तानी पत्रकार फैजान लखानी यांनी ट्विट करत लिहिले की, ‘आसिफ आफ्रिदीवर कलम 2.4 अंतर्गत भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहेत. त्याने भ्रष्टाचाराच्या दृष्टिकोनाबाबत अँटी करप्शन युनिटला याबाबत माहिती दिली नव्हती. आफ्रिदीने 118 प्रथमश्रेणी, 59 लिस्ट ए आणि 63 टी20 बळी घेतले आहेत.
Asif Afridi has been suspended by the PCB under anti corruption code, he had been charged under article 2.4 which relates to non reporting of corrupt approaches made to the player.
— Faizan Lakhani (@faizanlakhani) September 13, 2022
याशिवाय त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये अनुक्रमे 1303, 576 आणि 440 धावा केल्या आहेत. आसिफ पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधील मुलतान सुलतान संघाचा भाग आहे. या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील मालिकेदरम्यान, असिफ आफ्रिदीची मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघात निवड झाली होती. मात्र, त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पण सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता धवन फक्त ‘बदली कर्णधार’ म्हणूनच संघात सामील होणार का?
रैना, इरफानने गायलेल्या गाण्यांवर युवीचा बेधुंद डान्स, हा व्हिडिओ नाही पाहिला तर काय पाहिले!
अर्शदीपच्या निवडीनंतर आईने दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “माझ्या मुलाने या वयात…”