---Advertisement---

‘या’ पाकिस्तानी खेळाडूची मुलगी रुग्णालयात देतेय मृत्यूशी झुंज

On: बुधवार, जून 8, 2022 5:16 PM
Asif-Afridi-Daughter
---Advertisement---

पाकिस्तानी क्रिकेटर आसिफ आफ्रिदीची मुलगी रुग्णालयात जीवन-मरणाची लढाई लढत आहे. ती लवकरात लवकर बरे होण्यासाठी जगभरातून प्रार्थना केल्या जात आहेत. आफ्रिदीची मुलगी काही दिवसांपासून आजारी असून रुग्णालयात दाखल आहे.  आसिफचे दुर्दैव असे की, ३५ वर्षांचा असूनही त्याला अद्याप पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघातून खेळण्याची संधी मिळालेली नाही. २००९ मध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर आजवर त्याला एकदाही पाकिस्तानच्या संघात स्थान मिळालेले नाही.

अष्टपैलू खेळाडू असणारा असिफ आफ्रिदी (Asif Afridi)पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) २०२२मध्ये मुलतान सुलतान (Multan Sultan) संघाचा भाग होता. या हंगामात त्याने ५ सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करत ८ बळी घेतले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी२० मालिकेत त्याचा पाकिस्तान (Pakistan) संघात समावेश करण्यात आला होता. पण तो प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकला नाही. मोहम्मद नवाजच्या जागी त्याचा पाकिस्तान संघात समावेश करण्यात आला होता.

आसिफ आफ्रिदीने आपल्या मुलीचा रुग्णालयात दाखल केलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी भावनिक ट्विटमध्ये लिहिले की, कृपया तुम्ही सर्वजण माझ्या मुलीच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा. त्याच्या या ट्विटनंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू उमर गुल (Umar Gul) आणि सलमान बट (Salman Butt) पुढे आले आणि त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या दोन्ही माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी या मुलीच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

दरम्यान, पाकिस्तानच्या अनेक क्रिकेटपटूंनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून आसिफच्या मुलीसाठी प्रार्थना केली आहे. आसिफच्या मुलीवर सुरू असलेले उपचार लवकरात लवकर पूर्ण होऊन त्याची मुलगी सुखरूप बाहेर पडावी अशी प्रार्थना पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमद याने केली आहे. शिवाय संघातील अनेक खेळाडूंनी देखील याबाबत ट्विट करत प्रार्थना केली आहे.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

भावाच्या बलिदानामुळेच आज ईशान भारतीय संघात खेळतोय, वाचा काय आहे संपूर्ण गोष्ट

‘हिटमॅन’चा मोठा विक्रम तोडण्यास ‘कॅप्टन’ केएल राहुल सज्ज; दिल्ली टी२०त करणार पराक्रम

पाकिस्तानला नमवणारी ते आयसीसी स्पर्धा खेळणारी सर्वाधिक वयस्कर मिताली, तिचे ‘हे’ विक्रम मोडणे शक्य नाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---