मुंबईत होणाऱ्या डब्ल्यूआयएफएच्या राष्ट्रीय महिला लीग पात्रता फेरीसाठी शहरातील अस्पायर एफसी संघ सज्ज झाला असून, २५ खेळाडूंचा संघ त्यांनी या स्पर्धेसाठी जाहिर केला.
“आयडब्ल्यूएल स्पर्धेत पुण्याचे प्रतिनिधीत्व करणे हा आमचा केवळ सन्मान नव्हता, तर आम्हाला या स्पर्धेने गुणवान खेळाडूंची क्षमता अजमाविण्याची संधी मिळाली,” असे अस्पायर एफसीचे सह संस्थापक श्रीकांत अय्यर यांनी सांगितले.
अस्पायरने अजुषा शिरीन आणि सानिया व्हीएस या दोघींना आपल्या प्रसार भागीदार गोकुलम संघाकडून करारबद्ध केले आहे. बाहेरील पाच खेळाडू पूर्ण करण्यासाठी भारताची माजी १९ वर्षांखालील अनुभवी खेळाडू पूजा कर्माकर, आक्रमक गिता दास यांनाही अस्पायरने करारबद्ध केले आहे. या दोघी बंगालच्या आहेत.
या खेरीज पाच जिल्ह्यातील खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. यापूर्वी महिला लीग खेळण्याचा अनुभव असणाऱ्या या खेळाडू आहेत, असेही अय्यर यांनी सांगितले.
संघात अंजली बारके, मुरिएल ऍडम यांच्यासह पुण्यातील १३ खेळाडूंचा संघात समावेश आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघाचे नेतृत्व २४ वर्षीय मुरिएलकडे सोपविण्यात आले आहे.
मुंबईत होणाऱ्या या स्पर्धेत आठ संघ सहभागी असून, यात गतविजेते पीआयएफए स्पोर्टस,कुलाबा, केंकरे एफसी, मुंबई नाईटस, लॉलेस युनायटेड, पालर, फुटबॉल स्कूल ऑफ इंडिया,नवी मुंबई, फुटी फर्स्ट या संघांचा समावेश आहे. कोल्हापूर वॉरियर्स आणि पुणे वॉरियर्स हे स्पर्धेतील अन्य दोन संघ आहेत. राऊंड रॉबिन पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत अव्वल चार संघ ऑल प्ले ऑल फेस ऑफमध्ये खेळतील. यातील विजेता संघ या वर्षीच्या महिलांच्या मुख्य लीगमध्ये खेळेल.
संघ
गोलरक्षक – अंजली बारके, प्रतिक्षा माने (दोघी पुणे)
बचावपटू – आदिती शितोळे सपना राजपुरे, हर्षदा काळभोर, अंबर नाथ कौर (सर्व पुणे), दिपशिखा हिवळे (बुलढाणा), रिया बोलाके (कोल्हापूर), सोनिया (गोंदिया), वेदांगी गंडाळे (पुणे)
मध्यरक्षक – मुरिएल ऍडम, स्मिधी खोकळे (पुणे), पूजा कर्माकर (पश्चिम बंगाल), सानिया व्हीएस, अजुषा शिरीन (दोघी केरळ), साक्षी जाधव (नगर), अर्चना भालधरे (गोंदिया), स्वामिनी काकडे, पियुषा नरके (दोघी पुणे), भक्ती बिरांगडी (कोल्हापूर), निधी वर्मा, अस्मी कुलकर्णी (दोघी पुणे)
आक्रमक – गीता दास (पश्चिम बंगाल), ऐश्वर्या बुद्धे (गोंदिया), वैष्णवी बराटे (पुणे)
मुख्य प्रशिक्षक – अभिषेक परदेशी, सहाय्यक प्रशिक्षक – कैलाश परदेशी, निखील नायर, रणजीत जोशी, विकी परदेशी
संघ व्यवस्थापक – किरण जाधव, फिजिओ – डॉ. सिद्धी दुबे
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पंतप्रधान मोदींना भेटलो तेव्हा…’, भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीतने सांगितला किस्सा
‘विराट कोहली टायगर वुड्स सारखा आहे’, सलग २ शतके झळकावणाऱ्या झिम्बाब्वेच्या खेळाडूने केले कौतुक
‘जडेजाचा काही उपयोग नाही’ माजी दिग्गजाने टी-२० विश्वचषकाविषयी केलीये भविष्यवाणी