दुबई। आज (25 सप्टेंबर) एशिया कप 2018 स्पर्धेत भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात सुपर फोरचा सामना होणार आहे. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
हा धोनीचा वनडे कर्णधार म्हणून 200 वा सामना आहे. 200 वनडे सामन्यात नेतृत्व करणारा धोनी हा एकूण तिसराच क्रिकेटपटू ठरला आहे.
याआधी आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग आणि न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेंमिंग यांनी 200 पेक्षा जास्त वनडे सामन्यात त्यांच्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले आहे.
धोनीचे वय सध्या ३७ वर्ष आणि ८० दिवस आहे. त्यामुळे तो भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे.
यापुर्वी मोहम्मद अझरुद्दीनने ३६ वर्ष आणि १२४ दिवसांचा असताना भारताचे नेतृत्व केले होते. तेव्हा त्याने १९९९ च्या विश्वचषकात न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात हे नेतृत्व केले होते.
महत्वाच्या बातम्या –
-…आणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल
–रोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित
–म्हणून हरभजन सिंगने केले थर्ड अंपायरला ट्रोल