सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळली जात आहे. तसेच बलाढ्य इंग्लंड संघ न्यूझीलंडसोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या दोन कसोटी मालिकांचा परिणाम आयसीसीच्या ताच्या क्रमवारीवर झाल्याचे दिसते. मंगळवारी (21 फेब्रुवारी) जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत इंग्लंडचा दिग्गज जेम्स अँडरसन क्रमांक एकचा कसोटी गोलंदाज बनला. तर भारतीय अष्टपैलू रविंद्र जडेजा देखील सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून स्वतःच्या जागेवर कायम आहे.
इंग्लंड संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना इंग्लंडने 267 धावांनी जिंकला. या सामन्यातीर पहिल्या डावात जेम्स अँडरसन (James Anderson) याने तीन, तर दुसऱ्या डावात चार विकेट्स घेतल्या. या सामन्यातील सात विकेट्सचा फायदा त्याला कसोटी मंगळवारी आलेल्या ताच्या कसोटी क्रमवारीत झाल्याचे पाहायला मिळाले. वयाच्या 40व्या वर्षी अँडरसन कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज आणि कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याला मात्र ताच्या क्रमवारीत नुकसान सोसावे लागले.
पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर आला, पण मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये यजमान भारतीय संघाने त्यांचा दारून पराभव केला. कमिन्सचे या दोन सामन्यांतील वैयक्तिक प्रदर्शन देखील काही खास नव्हते. नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला फक्त एकदाच गोलंदाजी करावी लागली. कर्णधार कमिन्सने यात फक्त दोन विकेट्स घेतल्या आणि सामना एक डाव आणि 132 धावांनी गमावला. दुसऱ्या सामन्यात कमिन्स फक्त एक विकेट घेऊ शकला. या निराशाजनक प्रदर्शनानंतर आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज असलेला पॅट कमिन्स आता तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. भारताचा रविचंद्रन अश्विन एका स्थानाची उडी घेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
दुसरीकडे भारतीय संघाचे या कसोटी प्रमवारीत चांगलेच वर्चस्व पाहायला मिळाले. कर्णधार रोहित शर्मा कसोटी फलंदाजांच्या यादीत सातव्या क्रमांकावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कोसटी सामन्यांमध्ये रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja ), रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांनी जबरदस्त फिरकी गोलंदाजी केली आणि ऑस्ट्रेलियन संघाला गुडळे टाकण्यास भाग पाडले. कोसीट फिरकी अष्टपैलूंच्या यादीत जडेजाने त्याचा पहिला, तर अश्विनने स्वतःचा दुसरा क्रमांक कायम राखला आहे. अक्षर पटेलला मात्र यावेळी दोन स्थानांचा फायदा झाला असून तो आता पाचव्या क्रमांकाच कसोटी अष्टपैलू बनला आहे. अष्टपैलूंच्या यादीत मिचेल स्टार्क (6) आणि जेसन होल्डर (7) खाली घसरले असून पॅट कमिन्स मात्र एक स्थान वर सरकत आठव्या क्रमांकावर आला आहे.
रविंद्र जडेजा मागच्या काही महिन्यांमध्ये दुखापतीच्या कारणास्तव क्रिकेटच्या मैदानापासून लांब होता. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने ज्या पद्धतीने पुनरागमन केले, त्याचा अष्टपैलूला चांगलाच फायदा झाला. प्रकांक एकचा अष्टपैलू असलेला जडेजाने गोलंदाजांच्या यादीत 9व्या क्रमांकावर उडी घेतली आहे. तर फलंदाजांच्या यादीत तो 33व्या क्रमांकावर कायम आहे. (At the age of 40, James Anderson became the number 1 Test bowler again)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुड न्यूज! इंग्लंडच्या दिग्गज महिला खेळाडूची पार्टनर प्रेग्नंट; फोटो शेअर करत म्हणाली, ‘मला आनंद होतोय’
शॉकिंग! तीन धक्क्यांनंतर ऑस्ट्रेलियाला चौथा झटका, ‘हा’ दमदार खेळाडूही परतला मायदेशी; जाणून घ्याच