---Advertisement---

शॉकिंग! तीन धक्क्यांनंतर ऑस्ट्रेलियाला चौथा झटका, ‘हा’ दमदार खेळाडूही परतला मायदेशी; जाणून घ्याच

Australia-Test-Cricket-Team
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघासाठी भारत दौरा हा एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नाहीये. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023मध्ये ऑस्ट्रेलिया संघ 2-0ने पिछाडीवर आहे. 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत डेविड वॉर्नर आणि जोश हेजलवूड आधीच दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले आहेत. कर्णधार पॅट कमिन्स हादेखील कौटुंबिक समस्यांचे कारण देत मायदेशी परतला आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे. अशात संघाचा आणखी एक जबरदस्त खेळाडू मायदेशी परतला आहे.

‘हा’ खेळाडू परतला मायदेशी
ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू ऍश्टन एगर (Ashton Agar) हा पश्चिम ऑस्ट्रेलिया संघात सामील होण्यासाठी भारत दौऱ्यातून बाहेर पडला आहे. ऍश्टन एगर मायदेशात परतला आहे. तो शेफील्ड शील्ड आणि मार्श चषकाच्या अंतिम सामन्यासाठी उपलब्ध असेल. भारत दौऱ्यावर ऍश्टन बाकावरच होता. त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे त्याने घरी परतण्याचा निर्णय घेतला. मात्र, वनडे मालिकेत भाग घेण्यासाठी तो भारतात परतेल.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे राष्ट्रीय निवडकर्ते टोनी डोडेमॅड (Tony Dodemaide) यांनी बुधवारी (दि. 22 फेब्रुवारी) म्हटले की, ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ऍश्टन एगर याला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीतून मुक्त केले आहे. तो कसोटी संघातून मुक्त होताच मायदेशी परतला आहे. त्याला घरगुती संघाकडून क्रिकेट खेळण्यासाठी संघातून मुक्त केले आहे. एगर घरगुती स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात पश्चिम ऑस्ट्रेलियाकडून खेळेल.

भारताविरुद्ध मिळाली नाही संधी
नागपूर येथील पहिल्या कसोटीत ऍश्टनच्या जागी टॉड मर्फी (Todd Murphy) याला पदार्पण करण्याची संधी मिळाली. तसेच, दिल्ली कसोटीत कर्णधार पॅट कमिन्स याने अंतिम अकरामध्ये तीन फिरकीपटूंना संधी दिली. त्यात मर्फी, नेथन लायन आणि मॅथ्यू कुह्नेमन यांचा समावेश होता. ऍश्टन याने ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत 5 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 9 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, 20 वनडे सामन्यात त्याच्या नावावर 18 विकेट्स आणि 47 टी20 क्रिकेटमध्ये 48 विकेट्सचा समावेश आहे.

‘हे’ खेळाडू आधीच बाहेर
मायदेशी परतणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये पहिला खेळाडू मिचेल स्वेप्सन आहे. तो पहिल्या बाळाच्या जन्मासाठी ऑस्ट्रेलियाला परतला आहे. त्याच्यानंतर डेविड वॉर्नर आणि जोश हेजलवूड दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. कर्णधार पॅट कमिन्स आणि ऍश्टन एगर हेदेखील मायदेशी परतले आहेत. अशात तिसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरा कसोटी सामना 1 ते 5 मार्चदरम्यान पार पडणार आहे. तसेच मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना 9 ते 13 मार्चदरम्यान अहमदाबाद येथे खेळला जाईल. (cricketer ashton agar released from the australia squad for the last two tests against india)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चक्रीवादळामुळे न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाचा संसार रस्त्यावर, पाणावलेल्या डोळ्यांसह सांगितल्या वेदना
बला’त्काराच्या आरोपाखाली क्रिकेटरने खाल्ली जेलची हवा, पण जामीन मिळताच कमबॅक करत फलंदाजांचा काढला घाम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---