इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने घवगवीत यश मिळवले. आयपीएलच्या 16 व्या हंगामाची समाप्ती झाली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली, सीएसके संघाने डकवर्थ-लुईस नियमांनुसार अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव केला. विजेतेपद पटकावल्यानंतर चेन्नई संघाच्या चाहत्यांसोबतच खेळाडूंनीही मैदानावर जल्लोष साजरा केला. सीएसकेने जिंकलेली ही ट्रॉफी सध्या तिरुपती मंदीरात पोहोचली आहे. तर चला जाणून घेऊ या संदर्भातील माहिती.
सीएसके (Chennai Super Kings) विरुद्ध गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) लढतीत धोनीच्या संघाचे पारडे जड झाले आणि संघाने विजय आपल्या नावी केला. विजेतेपद पटकावल्यानंतर सीएसकेचे मालक एन. श्रीनिवासन आणि टीम मॅनेजमेंटचे लोक ट्रॉफी घेऊन चेन्नईतील तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात पोहोचले. यासंदर्भातील फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
पारंपारिक पद्धतीने झाली ट्रोफीची पुजा
मंदिराच्या पुजाऱ्यांनी पारंपारिक तमिळ विधींनी विजयी ट्रॉफीची पूजा केली. यावेळी भगवान तिरुपतीच्या चरणी देखील आयपीएल ट्रॉफी ठेवण्यात आली. त्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिले तर सीएसके संघातील एकही खेळाडू पुजेदरम्यान उपस्थित नव्हता. आयपीएल जिंकल्यानंतर मंदिरात पुजा करण्याची ही सीएसके व्यवस्थापनाची पहिली वेळ नाही. या आधीही ज्या ज्या वेळी संघाला यश मिळाले आहे त्यावेळी व्यवस्थापनाने तिरुपतीच्या चरणांना ट्रीफी लावली आहे.
N. Srinivasan was present at the special Pooja for the IPL 2023 Trophy. pic.twitter.com/FO67RB7SPo
— Johns. (@CricCrazyJohns) May 30, 2023
As DMK ministers celebrated CSK win as victory of Dravida model, the IPL trophy was brought to Tirumala Tirupati temple in Chennai & received by Brahmin Priests for special puja at Lord Venkateshwara’s sanctum.
It’s sad that Dravidian model of atheism, rationality & social… pic.twitter.com/WvbYZ3XkmP
— Cogito (@cogitoiam) May 30, 2023
IPL-2023 फायनलमध्ये चेन्नईने गुजरातला हरवले
आयपीएल 2023 चा (Indian Premier League) अंतिम सामना सीएसके विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना रविवार, 28 मे रोजी होणार होता, परंतु पावसामुळे तो होऊ शकला नाही. सामना राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी आयोजित करण्यात आला. मात्र, पुन्हा पावसाचा भडिमार सुरु झाल्याने सामना रात्री ऊशिरा सुरु झाला आणि तो मंगळवारी रात्री अखेरीस संपला. अंतिम सामन्यात चेन्नईने गुजरातचा पाच गडी राखून पराभव केला.
सीएसकेने पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली
सीएसकेने गुजरातला हरवून पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. चेन्नईने यापूर्वी 2010, 2011, 2018, 2021 मध्ये ट्रॉफी जिंकली होती. तर दुसरीकडे, एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने प्रत्येक वेळी चॅम्पियन पद भूषविले आहे. 25 चेंडूत 47 धावा करणारा डेव्हॉन कॉनवे सीएसकेचा सामनावीर ठरला.
धोनीची शस्त्रक्रिया पार पडली
आयपीएल सामन्यादरम्यान दुखापत झालेल्या महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) गुडघ्यावर गुरुवारी (1 मे) शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. धोनीला स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात दुखापत झाली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
“रोहितला हलक्यात घेऊ नका”, WTC फायनलआधी दिग्गजाने व्यक्त केला विश्वास
मुंबई भारी की चेन्नई? भर रस्त्यात भिडले ब्राव्हो-पोलार्ड, असा लागला निकाल






