सध्या देशभरातील अनेक शहरांमध्ये कर्नल सी.के नायडू ट्रॉफी ही 25 वर्षाखालील मुलांची स्पर्धा खेळली जात आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मुंबई विरुद्ध हैदराबाद या सामन्यात मुंबईने धावांचा डोंगर उभा केला. मुंबईच्या वरिष्ठ संघात खेळलेल्या मुशीर खान व अथर्व अंकोलेकर यांनी केलेल्या शानदार फलंदाजीमुळे मुंबईने मोठ्या धावा धावफलकावर लावल्या. त्यापैकी अथर्व याची कहाणी प्रेरणा देणारी आहे.
हैदराबाद जिमखाना येथे सुरू असलेल्या या सामन्यात पहिल्या दोन दिवसांत मुंबईने शानदार फलंदाजी करत यजमान संघावर वर्चस्व गाजवले. नुकताच रणजी ट्रॉफी संघाचा भाग होऊन परतलेल्या मुशीर खान याने या सामन्यात तुफान फलंदाजी केली. त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिले त्रिशतक शतक साजरे केले. त्याने अवघ्या 367 चेंडूंचा सामना करताना 339 धावांची खेळी केली. यात 34 चौकार व 9 षटकारांचा समावेश होता.
मात्र, त्यानंतर कर्णधार अथर्व अंकोलेकर यानेही द्विशतक पूर्ण केले. आपल्या फिरकी गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अथर्व याने 249 चेंडूवर 15 चौकार व 11 षटकारांच्या मदतीने 214 धावांची खेळी केली. त्यांच्या या फलंदाजामुळे मुंबईने आपला पहिला डाव 8 बाद 704 धावांवर घोषित केला.
अथर्व हा 2020 मध्ये भारताच्या अंडर 19 विश्वचषक संघाचा सदस्य होता. डावखुरा फिरकी गोलंदाज असलेल्या अथर्व याची कहाणी प्रेरणा देणारी आहे. अथर्व दहा वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्याची आई वैदही यांनी त्याचा सांभाळ केला. वैदही या मुंबई बेस्ट विभागात कंडक्टर म्हणून काम करतात. आईच्या या संघर्षाला अथर्व याने मेहनतीने साथ देत क्रिकेटपटू म्हणून आपले नाव कमावले. एक वेळ त्याच्या मनात क्रिकेट सोडण्याचा देखील विचार आला होता. मात्र, आईने त्याचा विश्वास वाढवत त्याला खेळण्यासाठी प्रेरणा दिली. अथर्व याने मुंबईसाठी लिस्ट ए व टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. (Atharva Ankolekar Hits Double Century In CK Naidu Trophy His Mom Bus Conductor)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शमी-हसीन जहॉं वादावर कोर्टाने दिला निकाल! दर महिन्याला द्यावी लागणार इतकी रक्कम
BREAKING: अखेर राहुल झाला आण्णाचा जावई! आथियाशी बांधली लग्नगाठ