सध्या चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर तामिळनाडू प्रीमियर लीग (टीएनपीएल) खेळली जात आहे. आठ संघाच्या या लीगला मागील आठवड्यात सुरुवात झाली. या लीगमध्ये नेलई रॉयल किंग्स संघाच्या एका खेळाडूने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. वेगवान गोलंदाज असलेल्या अथिसायाराज डेव्हिडसनने चाहत्यांना श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याची आठवण करून दिली.
चाहत्यांनी दिले हे नाव
नेलईसाठी खेळणारा २९ वर्षीय डेव्हिडसन सध्या त्याच्या गोलंदाजीच्या ऍक्शनमुळे चर्चेत आहे. त्याची गोलंदाजी ऍक्शन पाहून चाहत्यांनी त्याला ‘भारतीय लसिथ मलिंगा’ म्हणायलाही सुरवात केली आहे. डेव्हिडसन मलिंगाप्रमाणेच इनस्विन्गर यॉर्कर गोलंदाजी करू शकतो. यावेळी डेव्हिडसनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो मलिंगाप्रमाणेच इन्स्विंजर यॉर्करला गोलंदाजी करताना आणि फलंदाजाला बाद करताना दिसत आहे.
https://twitter.com/All_aboutsport_/status/1418935289704288256
मागील हंगामात आला होता चर्चेत
गेल्या मोसमात तो इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील काही संघांच्या रडारवर होता. त्याच्याकडे जास्त वेग नाही परंतु, आपल्या गोलंदाजीच्या शैलीमुळे त्याला अधिकाधिक बळी मिळतात असे बोलले जाते. डेव्हिडसन तमिळनाडूचा एक टी२० स्पेशालिस्ट स्पेशालिस्ट गोलंदाज आहे. आतापर्यंत तो टीएनपीएल २०२१ मध्ये दोन सामने खेळला असून त्याने तीन बळी घेतले आहेत.
अशी राहिली आहे कारकीर्द
डेव्हिडसनने २०१८-२०१९ या हंगामात तमिळनाडूसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आत्तापर्यंत २ लिस्ट ए सामने खेळताना तीन बळी मिळवले आहेत. तसेच, ९ टी२० सामन्यांमध्ये १२ बळी घेण्यात त्याला यश आले. पुढील वर्षी आयपीएलचा मेगा लिलाव होणार असल्याने त्याला आयपीएलमध्ये पदार्पणाची देखील संधी मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘कॅप्टनकूल’चे ३ आश्चर्यकारक निर्णय, ज्यांनी टीम इंडियाच्या पारड्यात टाकला फक्त विजय
टीम इंडियाची बातच न्यारी, वनडेत चक्क १२० वेळा उभारल्यात ३०० धावा; वाचा टॉप-१० संघांची कामगिरी