---Advertisement---

अथियाच्या इंस्टाग्राम पोस्टने चर्चेला उधाण; नेटकरी म्हणाले, ‘राहुलसोबत इंग्लंडमध्ये आहेस?’

On: शुक्रवार, जून 11, 2021 9:50 AM
---Advertisement---

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोमध्ये अथियाने एक जॅकेट घातला होता आणि हा जॅकेट अगदी हुबेहुब भारतीय यष्टीरक्षक केएल राहुलच्या जॅकेटप्रमाणे होता. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांची झुंबड उडाली होती. यानंतर नुकताच अथियाने एक नवा फोटो पोस्ट केला आहे, ज्यामुळे ती राहुलसोबत इंग्लंडला गेली असल्याची चर्चा रंगली आहे.

अथिया शेट्टीने मंगळवारी (०८ जून) तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये ती एका लॉनमध्ये उभी असल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये बॅकग्राऊंडमागील परिसर अगदी साउथम्पटनमधील परिसरासारखा असल्यासारखेच दिसून येत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपुर्वी राहुलनेही आपला साथम्पटनमधील अगदी असाच फोटो शेअर केला होता. त्यामुळे अथियाचा फोटो बघून चाहत्यांनी वेगवेगळे अंदाज बांधले आहेत. काही चाहत्यांनी तर अथिया इंग्लंडमध्ये असल्याच्याही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CP2raVPHhm6/?utm_source=ig_web_button_share_sheet

केएल राहुल सध्या भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारतीय संघ इंग्लंडमध्ये १८ जूनपासून साउथम्पटनच्या मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळणार आहे. यानंतर इंग्लंड संघाविरुद्ध भारतीय संघाला पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यावर त्यांच्या कुटुंबालासोबत घेऊन जाण्याची परवानगी दिली गेली आहे.

https://www.instagram.com/p/CPwBTRugT_V/?utm_source=ig_web_button_share_sheet

आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केएल राहुलला अंतिम ११ जणांच्या संघात स्थान मिळणे कठीण दिसून येत आहे. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये शुबमन गिलने रोहित शर्मासोबत मिळून संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे.

तसेच केएल राहुलची विशेषता आहे की, तो कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास सक्षम आहे. परंतु रिषभ पंत असताना त्याला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून देखील संघात स्थान मिळणे कठीण दिसत आहे. परंतु आयपीएल २०२१ स्पर्धेत तो चांगल्याच फॉर्ममध्ये होता. याची दखल घेत त्याला संघात स्थान दिले जाऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या-

‘मरेपर्यंत सचिनला बाद केल्याचा अभिमान असेल,’ म्हणणाऱ्या गोलंदाजांने आजच्याच दिवशी विश्वचषकात घेतली होती हॅट्रिक

विराट नव्हे ‘हे’ फलंदाज कव्हर ड्राइव्हचे मास्टर, कर्णधार आझमने सांगितली नावे

कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये सिराजची जागा पक्की, ३०३ विकेट्स घेणारा गोलंदाज बसणार बाकावर?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---