---Advertisement---

सगळं खोटं! ना 50 कोटींचा बंगला, ना महागड्या गाड्या; राहुल-अथियाला लग्नात दमडीही मिळाली नाही

On: शनिवार, जानेवारी 28, 2023 1:17 PM
KL-Rahul-And-Suniel-Shetty
---Advertisement---

सोमवारी (दि. 23 जानेवारी) खंडाळा येथे भारतीय संघाचा फलंदाज केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी संसार थाटला. अभिनेता सुनील शेट्टी याने त्याच्या मुलीचा लग्नसोहळा थाटामाटात करण्याची एकही संधी सोडली नाही. या जोडप्याचे लग्न एवढ्या थाटामाटात झाल्यामुळे त्यांना मित्रमंडळींकडून कोणकोणत्या भेटवस्तू मिळाल्या, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. माध्यमांमध्ये असे सांगण्यात आले की, कुटुंबीय आणि मित्रमंडळी जसे की, सलमान खान, जॅकी श्रॉफ, विराट कोहली, एमएस धोनी यांच्याकडून जोडप्याला महागड्या भेटवस्तू मिळाल्या. एका रिपोर्टमध्ये असेही म्हटले की, सुनीलने मुलीला मुंबईत 50 कोटींचा बंगलाही भेट म्हणून दिला. मात्र, या सर्व गोष्टी खोट्या असल्याचे ‘अण्णा’ने सांगितले आहे.

अथियाच्या कुटुंबाची प्रतिक्रिया
माध्यमांमध्ये केएल राहुल आणि अथिया शेट्टी (KL Rahul And Athiya Shetty) यांना लग्नात महागड्या भेटवस्तू मिळाल्याच्या बातम्या झळकल्या. यानंतर आता अथिया शेट्टी (Athiya Shetty) हिच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुटुंबीयांनी या बातम्यांचे खंडन केले आहे. ‘अण्णा’ म्हणून ओळखला जाणारा सुनील शेट्टी (Suniel Shetty) याने अधिकृत विधान जारी केले आहे. त्यात सांगण्यात आले आहे की, “बातम्यांमध्ये झळकणाऱ्या बातम्या आधारहीन आहेत. त्यात कोणतीही सत्यता नाहीये. आम्ही पत्रकार बांधवांना सार्वजनिक डोमेनमध्ये अशी चुकीची माहिती प्रकाशित करण्यापूर्वी आमच्याकडून त्याची पुष्टा करावी, अशी विनंती करतो.”

https://www.instagram.com/p/Cn1zFmBor62/?utm_source=ig_embed&ig_rid=ae434a66-e38b-4f11-8956-f58bcb6c3781

महागड्या भेटवस्तू
राहुल आणि अथियाला लग्नात अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्याची जोरदार चर्चा झाली. त्यात वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होता. वृत्तांमध्ये सांगण्यात आले होते की, माजी भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि एमएस धोनी (MS Dhoni) आपल्या सहकारी खेळाडूला लग्नानंतर महागड्या भेटवस्तू दिल्या. विराटने त्याच्या मित्रासाठी 2.17 कोटींची एक बीएमडबल्यू कार भेट म्हणून दिली. विराटप्रमाणे धोनीही लग्नात उपस्थिती नव्हता, पण त्याने कावासाकी निंजा बाईक राहुलला भेट दिली. या बाइकची किंमत 80 लाख रुपये आहे, असेही सांगण्यात आले.

https://www.instagram.com/p/CnwtWxgKsK9/

वृत्तांनुसार, बापमाणूस सुनील शेट्टी (Sunil Shetty) याने मुलगी आणि जावयाला मुंबईत एक आलिशान अपार्टमेंटही भेट म्हणून दिले,  ज्याची किंमत सुमारे 50 कोटी रुपये इतकी सांगितली गेली. याव्यतिरिक्त अथियाला बॉलिवूडमध्ये लाँच करणाऱ्या सलमान खान (Salman Khan) याने तिला 1.64 कोटी रुपयांची ऑडी कार भेट म्हणून दिल्याचेही सांगितले गेले.

एवढेच नाही, तर रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला की, जॅकी श्रॉफने जोडप्याला 30 लाखांची घड्याळे भेट म्हणून दिली. अर्जुन कपूरने 1.5 कोटींच्या हिऱ्याचे ब्रेसलेट दिल्याचेही सांगण्यात आले. (athiya shetty kl rahul did not get an expensive gift actor sunil shetty rejected all the reports read here)

कुठे पार पडला विवाहसोहळा?
अथिया आणि राहुल यांचा विवाहसोहळा 23 जानेवारी रोजी सुनील शेट्टी याच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर पार पडला. ही जोडी आयपीएल सामन्यांनंतर लग्नाचे रिसेप्शन ठेऊ शकते. त्यात कमीत कमी 3000 पाहुणे सामील होऊ शकतात.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तू मजबूत राहा, तुझा अभिमान आहे’, अखेरच्या ग्रँड स्लॅममध्ये हारताच सानियासाठी शोएबची भावूक पोस्ट
पत्नीसोबत नाचतानाही अक्षरने सोडले नाही क्रिकेट, डान्स फ्लोअरवर लावला षटकार अन् पकडला कॅच; व्हिडिओ पाहाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---