एटीपी चषक टेनिस स्पर्धा यावेळी १ ते ५ फेब्रुवारी दरम्यान होणार असून यामध्ये १२ संघ खेळत आहेत. कोविड १९ च्या साथीमुळे यावेळी संपूर्ण स्पर्धा ही मेलबर्न पार्कमध्ये खेळली जात आहे.
एटीपी चषकाचे गतविजेते सार्बिया संघाचा नोव्हाक जोकोविच आणि गतउपविजेता स्पेनचा राफेल नदाल या टेनिस स्पर्धेतून पुनरागमन करणार होते.
पहिली एटीपी चषक स्पर्धा मागील वर्षी खेळली गेली होती. ऑस्ट्रेलियामधील तीन शहरांमध्ये ही स्पर्धा खेळली गेली होती आणि यातच जोकोविचच्या सर्बियन संघाने सिडनी येथे झालेल्या अंतिम सामन्यात नदालच्या स्पॅनिश संघाचा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव नोंदविले होते.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या नदालने आपल्या पाठदुखीमुळे एटीपी चषक टेनिस स्पर्धेच्या सुरवातीच्या सामन्यातून माघार घेतली होती. परंतु या आठवड्यात तो आपल्या संघात पुन्हा परतण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या ऍलेक्स डी मिनोर विरुद्ध मंगळवारी होणाऱ्या सामन्याआधी त्याने ट्विटर घोषणा केली की मला पाठीच्या खालच्या बाजूला दुखापत झालेली असून आशा आहे की गुरुवारपर्यंत नक्कीच फिट होईन. नदालच्या बाहेर पडल्यानंतर रॉबर्ट बॉटिस्टा अगुट हा स्पेन पहिल्या क्रमांकाचा खेळाडू बनला आहे आणि पाब्लो कॅरेनो दुसऱ्या स्थानावर असेल.
Hi all, we have decided with #TeamSpain and my team, to not play today the first match of the @ATPCup here in #Melbourne since I have a stiff low back. Hopefully I’ll be better for Thursday. We have a strong team, all the to @pablocarreno91 @BautistaAgut & @M_Granollers #vamos ????????
— Rafa Nadal (@RafaelNadal) February 2, 2021
नोव्हाक जोकोविचच्या नेतृत्वाखाली सार्बियाने कॅनडावर २-१ ने विजय मिळवत स्पर्धेच्या मोहिमेला सुरवात शानदार सुरुवात केली. जेकोविचने डेनिस शापोवालोवचा ७-५,७-५ असा पराभव केला. त्यानंतर त्याने फिलिप क्राझिनोव्हियच्या जोडीने मिलोस राओनिक आणि शापोवालोव यांच्या जोडीला ७-५, ७-६ फरकाने हरविले.
गट सी मध्ये इटलीने ऑस्ट्रियाचा २-१ ने पराभव केला. मॅटिओ बेरेटिनने युएस ओपन चॅम्पियन डोमेनिक थीमवर ६-२,६-४ च्या फरकाने विजय मिळवला. डेनिस नोवाकच्या फॅबीओ फोग्नीनीवरच्या विजयासह ऑस्ट्रियाने आघाडी घेतली. बेरिटिनोनेह्या वेळी दुहेरी सामना जिंकण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली.
महत्त्वाच्या बातम्या –
धक्कादायक! फाईट सुरू असताना बॉक्सरच्या चेहऱ्याला मुक्का लागून मृत्यू, पहा व्हिडिओ
ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीची परंपरा पुढे नेणारा नॅथन कुल्टर-नाईल
सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या अशोक डिंडाच्या नावावर आहे ‘हा’ मोठा विक्रम






