रशियाचा स्टार टेनिसपटू डॅनिल मेदवेदेवने एटीपी फायनल्स स्पर्धेत उपांत्य फेरीत दिमाखात एन्ट्री केली आहे. मेदवेदेवने पुरुष एकेरीच्या साखळी सामन्यात सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला ६-३, ६-३ ने पराभूत केले.
साखळी सामन्यात मेदवेदेवचा पुढील सामना शनिवारी (२१ नोव्हेंबर) अर्जेंटिनाच्या डिएगो श्वार्टझमॅनशी होणार आहे. जोकोविचला आता उपांत्य सामना गाठण्यासाठी आपल्या पुढील सामन्यात जर्मनीच्या ऍलेक्झांडर झ्वेरेवला पराभूत करावे लागेल.
मेदवेदेवने दुसऱ्यांदा या स्पर्धेत भाग घेतला आहे. सोबतच त्याने या स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला आहे. मेदवेदेवने यापूर्वी साखळी सामन्यात झ्वेरेवला ६-३, ६-४ने पराभूत केले होते.
Is Daniil your pick to go all the way?
🇷🇺 @DaniilMedwed has qualified for the semi-finals after defeating Djokovic 6-3, 6-3! #NittoATPFinals pic.twitter.com/eFhi48TB8R
— ATP Tour (@atptour) November 18, 2020
राफेल नदालही उपांत्य फेरीसाठी पात्र –
शुक्रवारी(२० नोव्हेंबर) रात्री स्पेनचा राफेल नदाल आणि ग्रीसचा स्टिफानोस त्सित्सिपास साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात आमने-सामने आले होते. या सामन्यात नदालने त्सित्सिपासला ६-४,४-६,६-२ अशा तीन सेटमध्ये पराभूत करत दिमाखात उपांत्य फेरी गाठली. त्यामुळे आता नदालला उपांत्य सामना रशियाच्या डॅनिल मेदवेदेवशी २१ नोव्हेंबरला होईल.
Is this the year 🇪🇸 @RafaelNadal takes the title? 🏆
He moves into the semi-finals with a 6-4, 4-6, 6-2 win over Tsitsipas! 👏#NittoATPFinals pic.twitter.com/x1V6k43uOE
— ATP Tour (@atptour) November 19, 2020
झ्वेरेव विरुद्ध जोकोविच –
एटीपी फायनल्समध्ये आत्तापर्यंत डॉमनिक थीम, राफेल नदाल आणि डॅनिल मेजवेदेवने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता केवळ १ जागा बाकी आहे. शनिवारी(२० नोव्हेंबर) अव्वल मानांकित नोवाक जोकोविच विरुद्ध ऍलेंक्सझँडर झ्वेरेव यांच्यात साखळी फेरीचा सामना होणार आहे. यांच्यातील जो खेळाडू सामना जिंकेल तो उपांत्य फेरीत प्रवेश करणारा चौथा टेनिसपटू ठरेल.
वाचा-
ATP Finals – जोकोविचची धडाक्यात सुरुवात, डिएगो श्वार्टझमॅन केले पराभूत