सोमवारी (१७ नोव्हेंबर) एटीपी फायनल्स स्पर्धेत साखळी फेरीतील सामना सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच आणि अर्जेंटिनाचा स्टार टेनिसपटू डिएगो श्वार्टझमॅन यांच्यात झाला. हा सामना जोकोविचने ६-३, ६-२ ने जिंकला. हा सामना त्याने १ तास आणि १८ मिनिटांमध्ये आपल्या नावावर केला. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यातील हा त्याचा सलग १२ वा विजय आहे.
सन २००७ मध्ये शांघाई येथे तो या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात केवळ एक वेळा पराभूत झाला होता.
विजयानंतर जोकोविचने म्हटले की, “२००७ मध्ये शांघाईमध्ये पदार्पणावेळी साखळी फेरीत तीन सामन्यात मला पराभवाचा सामना करावा लागला होता. मला वाटते की, हा प्रकार असाच आहे की जर तुम्ही एक सामना जरी पराभूत झाला, तरी तुम्हाला उपांत्य सामन्यात क्वालिफाय करण्याची संधी मिळेल.”
जोकोविचने सहाव्यांदा जागतिक अव्वल क्रमांक पटकावत हंगामाचा शेवट केला. त्याने यापूर्वी २०११, २०१२, २०१४, २०१५ आणि २०१८ मध्ये जागतिक अव्वल क्रमांक पटकावला होता. यासोबतच त्याने या हंगामात ४० विजय मिळवण्याच्या एँड्र्यू रुबलेव्हच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
वाचा-
“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिर्ची…”, युवराज सिंगकडून सानिया मिर्झाला अनोखी उपाधी
वेब सीरिजद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार टेनिस स्टार सानिया मिर्झा