लंडन । येथे सुरु असलेल्या एटीपी फायनल्समध्ये डेव्हिड गॉफिनने उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. त्याने डॉमिनिक थीमचा ६-४, ६-१ असा पराभव केला.
डेव्हिड गॉफिनसमोर उपांत्यफेरीत ६वेळच्या एटीपी फायनल्स विजेत्या रॉजर फेडररचे आव्हान असणार आहे. फेडरर सध्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असून तो आणि गॉफिन समोरासमोर येण्याची ही ७वेळ असेल.
यापूर्वी फेडररने गॉफिनला ६ पैकी ६वेळा पराभूत केले आहे. गॉफिनचे सध्या वय २६ असून तो २१व्या वर्षी पहिल्यांदा फेडररविरुद्ध पराभूत झाला होता. गॉफिन फेडररपेक्षा १० वर्षांनी लहान आहे.
गेल्यावर्षी टेनिसपासून दूर राहिलेल्या फेडररने यावर्षी जबदस्त कामगिरी करत जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले. एवढेच नाही तर ह्या खेळाडूने यावर्षी २ ग्रँडस्लॅम विजेतेपदं तर एकूण ७ विजेतेपदं मिळवली आहेत तर १ उपविजेपदही त्याच्या नावावर आहे.
साखळी सामन्यात गॉफिनने राफेल नदाल आणि डेव्हिड गॉफिन या खेळाडूंवर विजय मिळवला आहे तर ग्रिगोर दिमित्रोव्ह या खेळाडूकडून तो पराभूत झाला आहे.
फेडररने साखळी फेरीचे सर्व सामने जिंकताना अलेक्झांडर झवेरेव, मारिन चिलीच आणि जॅक शॉक या खेळाडूंवर विजय मिळवला आहे.
दुसऱ्या उपांत्यफेरीत ग्रोगॉर दिमित्रोव्ह आणि जॅक शॉक हे खेळाडू खेळणार आहेत.