---Advertisement---

ठरलं तर! पुढीलवर्षी ‘या’ महिन्यात पार पडणार आयपीएल २०२२ लिलाव

On: मंगळवार, डिसेंबर 21, 2021 11:46 AM
IPL Auction
---Advertisement---

येत्या काही दिवसात जगप्रसिद्ध क्रिकेट लीग स्पर्धा, इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल (IPL) स्पर्धेच्या १५ व्या हंगामाला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत आता ८ ऐवजी १० संघ खेळताना दिसून येणार आहे, तर स्पर्धा सुरू होण्यापूर्वी खेळाडूंचा महालिलाव (ipl auction 2022) देखील आयोजित करण्यात येणार आहे. या लिलाव सोहळ्यापूर्वी सर्व जुन्या ८ संघांनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आता आयपीएल लिलाव सोहळा कधी होणार हा प्रश्न अनेकांना पडला असेल. याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. (Ipl auction date 2022)

आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने(ipl governing council) आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. परिषदेने सर्व संघांना याबाबत माहिती दिली आहे.

पुढील हंगामासाठी पंजाब किंग्ज संघाने २ खेळाडूंना रिटेन केले आहे. आता त्यांच्याकडे ७२ कोटी रुपये शिल्लक आहेत, तर सनरायझर्स हैदराबाद संघाकडे ६८ कोटी रुपये शिल्लक आहेत. तसेच दिल्ली कॅपिटल्स संघाने ४ खेळाडूंना रिटेन केले आहे. त्यांच्याकडे ४७.५ कोटी रुपये शिल्लक आहेत.

तसेच कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांनी देखील ४ -४ खेळाडूंना रिटेन केले आहे. तर सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांनी प्रत्येकी ३-३ खेळाडूंना रिटेन केले आहे.

आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी

चेन्नई सुपर किंग्ज(Chennai Super Kings) : रवींद्र जडेजा (१६ कोटी रुपये), एमएस धोनी (१२ कोटी), मोईन अली (८ कोटी ) ऋतुराज गायकवाड ( ६ कोटी)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर(Royal Challengers Bangalore) : विराट कोहली (१६ कोटी), ग्लेन मॅक्सवेल (११ कोटी), मोहम्मद सिराज (७ कोटी)

पंजाब किंग्ज(Punjab Kings): मयंक अग्रवाल (१२ कोटी, १४ कोट), अर्शदीप सिंग (४ कोटी)

दिल्ली कॅपिटल्स(Delhi Capitals): रिषभ पंत (१६ कोटी), अक्षर पटेल (९ कोटी), पृथ्वी शॉ (७.५ कोटी), एनरिक नॉर्खिया (६.५ कोटी)

सनरायझर्स हैदराबाद(Sunrisers Hyderabad): केन विलियमसन (१४ कोटी), अब्दुल समद (४ कोटी), उमरान मलिक (४ कोटी)

कोलकाता नाइट रायडर्स(Kolkata Knight Riders): आंद्रे रसेल (१२ कोटी) वरुण चक्रवर्ती (८ कोटी), व्यंकटेश अय्यर (८ कोटी), सुनील नरेन (६ कोटी)

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians): रोहित शर्मा (१६ कोटी), जसप्रीत बुमराह (१२ कोटी), सूर्यकुमार यादव (८ कोटी), कायरन पोलार्ड (६ कोटी)

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals): संजू सॅमसन (१४ कोटी), जोस बटलर (१० कोटी), यशस्वी जयस्वाल (४ कोटी)

महत्वाच्या बातम्या :

दक्षिण अफ्रिका दौऱ्यात पहिल्या घासाला खडा लागण्याची शक्यता; ‘हे’ आहे कारण

काय रे हे? या तिघांना पूर्ण कारकिर्दीत दुहेरी धावसंख्या गाठताना आले नाकीनऊ

भुवनेश्वर कुमारने शेअर केला नवजात मुलीचा पहिला फोटो; चाहते म्हणाले, ‘नाव तरी सांगा’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---