---Advertisement---

प्रो कबड्डी सीजन ७ साठी आज मुंबईत लिलाव, कोण होणार करोडपती ?

On: सोमवार, एप्रिल 8, 2019 11:46 AM
---Advertisement---

मुंबई- प्रो कबड्डी सीजन ७ साठी आज मुंबई येथे लिलाव होत आहे. प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये कोण होणार करोडपती ? सर्व कबड्डी रसिकांना उत्सुकता लागली आहे. लिलाव आधीच दीपक हुडा व फझल आत्रचली हे दोघे करोडपती झाले आहेतच. दोघांना आपआपल्या संघानी कायम केलं आहे. आता लिलावात कोणावर लागणार बोली सर्वाधिक बोली यावर लक्ष वेधले आहे.

प्रो कबड्डी सीजन ७ साठी होत असलेल्या या लिलावात बोली साठी ४७० खेळाडु उपलब्ध असून १२ संघ आपला संघ विकत घेण्यासाठी बोली लावणार आहेत. प्रत्येक संघाकडे खेळाडु विकत घेण्यासाठी ४.४० कोटी रुपये असणार आहेत. त्यापैकी संघानी काही रक्कम खेळाडु रिटेन करण्यात खर्च केली आहे.

प्रत्येक संघाला जास्तीत जास्त २५ तर कमीतकमी १८ खेळाडु घेता येणार आहेत. त्यात कमीत कमी २ तर जास्तीत जास्त ४ विदेशी खेळाडु घेता येणार आहेत. प्रत्येक संघाला ६ न्यू यंग प्लेअरला संघात स्थान द्यायचं आहे.

लिलावात खेळाडूंच्या श्रेणी नुसार त्यांची मूळ किंमत ठरवली असून ‘अ’ श्रेणीतील खेळाडूंची मूळ किंमत ३० लाख रुपये असणार आहे. ‘ब’ श्रेणीतील खेळाडूंची मूळ किंमत २० लाख रुपये असणार आहे. तर ‘क’ श्रेणीतील खेळाडूंची मूळ किंमत १० लाख रुपये असून ‘ड’ श्रेणी साठी ६ लाख रुपये असणार आहे. एनवायपी साठी ७.२६ लाख रुपये वेतन असणार आहे.

प्रो कबड्डी सीजन ७ च्या लिलावात सर्वाधिक लक्ष सिद्धार्थ देसाई वर असणार आहे. मागील सीजन मध्ये प्रदार्पणात उत्कृष्ट खेळ करत सिद्धार्थ देसाईने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच राहुल चौधरी, रिशांक देवडीगा, नितीन तोमर, मोनू गोयत यांच्या बोली महत्वपूर्ण असणार आहेत. डिफेंडर मध्ये विशाल भारद्वाज,सुरेंद्र नाडा, गिरीश इरणक, परवेश भैस्वाल यांच्यावर लक्ष असेल. अबोझर, जंग कुन ली याविदेशी खेळाडूंवर ही चांगल्या बोलीच्या अपेक्षा आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment