टी20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. इंग्लंडने यजमान संघाला पराभूत करत मालिका 2-0 अशी जिंकली. या मालिकेतील पहिला सामना चांगलाच चर्चेत आला होता. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर-फलंदाज मॅथ्यू वेड याने त्याची झालेली चूक कबूल केली आहे.
झाले असे की, पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू होती तेव्हा मॅथ्यू वेड (Matthew Wade) याने बाद होण्यापासून वाचण्यासाठी इंग्लंडचा गोलंदाज मार्क वूड (Mark Wood) याला धक्का दिला. हे सर्व प्रकरण ऑस्ट्रेलिया संघाच्या 17व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर घडले. वेडने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू योग्यरीत्या बॅटवर आला नाही आणि तो हवेत उडाला. अशात गोलंदाज वूडकडे हा झेल घेत वेडला बाद करण्याची सुवर्णसंधी होती.
त्यावेळी इंग्लंडने वेडविरुद्ध ‘ऑब्सट्रक्टिंग द फील्ड’ (अडथळा निर्माण करणे) या नियमाची अपील केली नाही. अशात मैदानात उपस्थित पंचांनी हे प्रकरण तिसऱ्या पंचांकडे पाठवले नाही. आयसीसीच्या नियामानुसार वेड आऊट होता, मात्र इंग्लंडच्या खेळाडूंनी अपील केले नाही यामुळे तो बचावला आणि आपण चुकलो याची वेडला जाणीव झाली. तसेच तो 15 चेंडूत 21 धावा करून बाद झाला.
“मी जेव्हा सामना झाल्यानंतर हा प्रकार पाहिला तर तो खूपच विचित्र वाटला,” असे वेडने क्रिकेट डॉट कॉम एयूच्या पॉडकास्टमध्ये म्हटले आहे.
“मला वाटते केन रिचर्ड्सन सांगितले होते की ‘मी त्याला ढकलले.’ मी मात्र काहीही न झाल्याप्रमाणे वागलो आणि त्यानंतर मी पुन:पुन्हा तो व्हिडिओ पाहिला आणि तेव्हा कळले की चूक माझीच होती. वूड 150च्या गतीने गोलंदाजी करतो. त्यात प्रेक्षकसंख्याही भरपूर होती. जेव्हा तो चेंडू टाकला गेला तेव्हा माझ्या डोक्यात एकच विचार होता विकेट वाचवण्याचा आणि डेवीनेही (वॉर्नर) मला परत जाण्यास सांगितले, असेही वेडने पुढे म्हटले आहे.
Wade lucky there for not being given out obstructing the field. Clearly gets in the way and stops Mark Wood . Umpires should have seen through it. Australians and their dirty tactics! #AUSvENG #ENGvAUS pic.twitter.com/bYpTGSk8FK
— ziaaa⁵⁶ (@BBARMY56) October 9, 2022
पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कोणताही ऑस्ट्रेलियन खेळाडू मैदानात अडथळा आणत बाद झाला नाही आणि केवळ 11 फलंदाज अशाप्रकारे आपली विकेट गमावली आहे.
बेन स्टोक्सला 2015 मध्ये एका वनडे सामन्यात वादग्रस्तपणे बाद देण्यात आले तेव्हा विकेटकीपींग वेड करत होता. वेड म्हणाला की, त्याला बाद दिले असते तर त्याने विरोध केला नसता.
काय सांगतो आयसीसीचा ‘हा’ नियम?
वेडने ‘ऑब्सट्रक्टिंग द फील्ड’चा आयसीसीचा तिसरा नियम 37.3 मोडला. या नियमानुसार, जर कोणताही फलंदाज झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकामध्ये अडथळा निर्माण करत असेल, तर त्याला बाद घोषित केले जाऊ शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमवल्यानंतर रोहितचे मोठे विधान, सूर्यकुमार अन् शमीचं गायलं गुणगान
अखेर 19 व्या षटकाचा शाप मिटला! हर्षलने केवळ 5 धावा देत वाचवली मॅच