मुंबई | क्रिकेट विश्वचषक २०१९ला बरोबर १०७ दिवस राहिले आहेत. त्यापुर्वी टीम इंडिया फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारतीय संघ शेवटची आंतरराष्ट्रीय मर्यादीत षटकांची मालिका खेळणार आहे.
त्यानंतर भारतात आयपीएल या लीग क्रिकेटला सुरुवात होणार आहे. २३ मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना खेळला जाणार आहे.
त्यानंतर टीम इंडिया थेट इंग्लंडला रवाना होणार आहे. विश्वचषकापुर्वी संघाला २ टी२० आणि ५ वनडे सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायला मिळणार आहे.
२४ फेब्रुवारी आणि २७ फेब्रुवारी रोजी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाबरोबर हे २ टी२० सामने खेळणार आहे. पहिला सामना विशाखापट्टनम तर दुसरा सामना बेंगलोरला होणार आहे.
त्यानंतर 2 मार्चपासून वनडे मालिकेला सुरुवात होईल. या वनडे मालिकेतील पहिला सामना हैद्राबादला होणार आहे. त्यानंतर नागपूर, रांची, मोहाली आणि दिल्ली येथे वनडे सामने होतील.
टी20 सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होतील. तर वनडे सामने दुपारी 1.30 वाजता सुरु होतील.
ही मालिका दोन्ही संघासाठी मेमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.
या मालिकेतील केवळ एकच सामना महाराष्ट्रात होणार आहे. हा मालिकेतील दुसरा सामना असून तो ५ मार्च रोजी नागपुर येथे होणार आहे.
असा असेल ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा –
टी20 मालिका –
पहिला टी20 सामना – 24 फेब्रुवारी – बंगळूरु – वेळ: संध्या. 7.00 वाजता
दुसरा टी20 सामना – 27 फेब्रुवारी – विशाखापट्टणम – वेळ: संध्या. 7.00 वाजता
वनडे मालिका –
पहिला वनडे सामना – 2 मार्च – हैद्राबाद – वेळ: दुपारी 1.30 वाजता
दुसरा वनडे सामना – 5 मार्च – नागपूर – वेळ: दुपारी 1.30 वाजता
तिसरा वनडे सामना – 8 मार्च – रांची – वेळ: दुपारी 1.30 वाजता
चौथा वनडे सामना – 10 मार्च – मोहाली – वेळ: दुपारी 1.30 वाजता
पाचवा वनडे सामना – 13 मार्च – दिल्ली – वेळ: दुपारी 1.30 वाजता
महत्त्वाच्या बातम्या-
–सुरेश रैनाच्या निधनाच्या सर्व बातम्या खोट्या, स्वत: रैनानेच केला खुलासा
–ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्माबद्दल होणार हा निर्णय
–अखेर फॅब४ मधील जो रुटने किंग कोहलीचा विक्रम मोडलाच, चारही खेळाडूंमधील स्पर्धा वाढली
–मुंबईकर अजिंक्य रहाणे विरुद्ध मुंबईकर वसिम जाफर येणार आमने-सामने