भारताचे माजी दिग्गज सुनिल गावसकर यांनी भारतीय संघाचे ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन केले आहे. यावेळी भारतीय कर्णधार विराट कोहलीने हातात ट्रॉफी घेतल्याचे बघून त्यांना गहिवरून आले होते.
“मला भारतीय संघावर खूप गर्व होत आहे. जेव्हा कोहली विजयाची ट्रॉफी हातात घेत होता तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते”, असे गावसकर यांनी इंडिया टुडेला मुलाखत देताना सांगितले.
भारतीय संघाने अॅडलेड आणि मेलबर्न कसोटी सामना जिंकत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली होती. ही आघाडी कायम ठेवण्याचा सिडनी कसोटीतही भारतीय संघाने प्रयत्न केले होते. सिडनी कसोटी पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत राहिली. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियामध्ये 71 वर्षांनी कसोटी मालिका विजय मिळवला आहे.
“ऑस्ट्रेलियामध्ये खेळणे कठीण आहे. पण पुजाराने संयमाने खेळत संघाच्या विजयाला हातभार लावला”, असे म्हणत गावसकरांनी मालिकावीर चेतेश्वर पुजाराचे कौतुक केले.
पुजाराने या मालिकेत एकूण 521 धावा केल्या. यामध्ये त्याच्या 3 शतके आणि 1 अर्धशतकाचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–रहाणेसह टीम इंडियाचे हे खेळाडू परतले भारतात
–कसोटी मालिकेतील स्टार रिषभ पंतला वनडे संघातून या कारणामुळे वगळले
–आयपीएल २०१९चा थरार रंगणार या देशात!