fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कसोटी मालिकेतील स्टार रिषभ पंतला वनडे संघातून या कारणामुळे वगळले

भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्तम कामगिरी केली आहे. त्याने सिडनी कसोटीमध्ये नाबाद 159 धावांची खेळी केली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियामध्ये शतक करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत 350 धावा करणाऱ्या पंतला मात्र ऑस्ट्रेलिया विरुद्ध वन-डे मालिकेतून वगळण्यात आले आहे. त्याला विश्रांतीच्या कारणास्तव संघात घेतले नाही, असे भारतीय संघनिवड अधिकारी एमएसके प्रसाद यांनी यामागचे कारण स्पष्ट केले आहे.

“ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने टी20 आणि कठीण कसोटी मालिका संपूर्ण खेळली आहे. यामुळे त्याला आरामाची गरज आहे”, असे प्रसाद यांनी सांगितले.

“पंत एक उत्कृष्ठ यष्टीरक्षक आहे याबाबत काही चुकीचे नाही. तो इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी वन-डे विश्वचषकासाठी संघाचा भाग असणार आहे”, असेही प्रसाद यांनी पुढे सांगितले आहे.

वन-डे विश्वचषकासाठी पंत बरोबरच एमएस धोनी आणि दिनेश कार्तिक हे दोघेही यष्टीरक्षकासाठीचे पर्याय आहेत.

पंतने ऑस्ट्रेलिया आधी इंग्लंड दौऱ्यातही कसोटीमध्ये शकत ठोकले आहे. यामुळे तो इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात कसोटीमध्ये शतक करणारा पहिलाच भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.

ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत पंतने 21 क्रमांकानी झेप घेत 17वा क्रमांक गाठला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात तीन वन-डे सामन्यांची मालिका होणार आहे. पहिला वन-डे सामना 12 जानेवारीला सिडनी येथे खेळला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रिषभ पंतचा नादच खुळा! आज पुन्हा धोनीचा कसोटी क्रमवारीचा विक्रम मोडला

आयपीएल २०१९चा थरार रंगणार या देशात!

कसोटी मालिकेत शानदार विजय मिळणारी टीम कोहली होणार मालामाल

You might also like