---Advertisement---

AUS v IND : निर्णायक चौथ्या कसोटीत पाऊस बनणार व्हिलन? पाहा कसे असेल ब्रिस्बेनचे हवामान

On: गुरूवार, जानेवारी 14, 2021 11:48 AM
---Advertisement---

ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात १५ जानेवारीपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर सुरु होणार आहे. हा सामना भारताच्या २०२०-२१ वर्षातील ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवटचा सामना असेल. त्यामुळे भारतीय संघ दौऱ्याचा शेवट हा सामना जिंकून मालिका विजयासह गोड करण्याच्या उद्देशानं मैदानात उतरेल, तर घरच्या मालिकेत विजय मिळवण्याचा आणि ब्रिस्बेन कसोटीतील विजयाची साखळी अखंडीत राखण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल. मात्र सामन्यावर पावसाचे सावट आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील हा निर्णायक कसोटी सामना आहे. पण या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ५.३० वाजता सुरु होणार आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी लख्ख प्रकाश असेल. तर दुसऱ्या दिवशी वातावरण बऱ्यापैकी ढगाळ असणार आहे. मात्र, सामन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी म्हणजेच १७ आणि १८ जानेवारीला मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर ५ व्या दिवशी वातावरण ढगाळ असेल.

त्यामुळे जर या सामन्यात पावसाचा मोठ्या प्रमाणात व्यत्यय येऊन सामना अनिर्णित राहण्याची दाट शक्यता आहे. यामुळे ही मालिका बरोबरीत सुटू शकते. कारण पहिल्या तीन सामन्यांनंतर या मालिकेत १-१ ने बरोबरी झाली आहे. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकला होता. तसेच तिसरा सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे ब्रिस्बेनला होणारा सामना निर्णायक सामना आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

कमालच! केवळ ३६ चेंडूत शतक करत सोफी डिवाईनने मोडला ११ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम, पाहा व्हिडिओ

बीसीसीआय समोर अखेर झुकले ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड, हॉटेलमध्ये खेळाडूंना मिळाल्या ‘या’ सुविधा

श्रीसंत विरुद्ध जयस्वालचा हल्लाबोल, एकाच षटकात ठोकल्या ‘इतक्या’ धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---