बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया शनिवारी (11 नोव्हेंबर) आपला शेवटचा ग्रुप स्टेज सामना खेळण्यासाठी आमने सामने आले. पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर हा सामना आयोजित केला गेला असून बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभी केली. असे असले तरी ऍडम झॅम्पा आणि शॉन ऍबॉट यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट्स घेतल्या, ज्या संघासाठी महत्वाच्या होत्या. यादरम्यान झॅम्पाच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली.
बांगलादेशला या सामन्यात नाणेफेक गमावल्यामुळे प्रथम फलंदाजी करावी लागली. प्रथम गोलंदाजीला आलेला ऑस्ट्रेलियन संघ बांगलादेशच्या धावांवर लगाव लावू शकला, असे म्हणता येणार नाही. बांगलादेशने 50 षटकांच्या डावात 8 विकेट्सच्या नुकसानावर 306 धावा केल्या. यात तौहिद ह्रदोय याने सर्वाधिक 74 धावांचे योगदान दिले. ऍडम झॅम्पा याने 10 षटकात 61 धावा खर्च करून दोन विकेट्स घेतल्या. सोबतच विश्वचषक हंगामातील आपल्या 22 विकेट्स त्याने पूर्ण केल्या. झॅम्बा एका विश्वचषक हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा ऑस्ट्रेलियन फिरकीपटू ठरला आहे.
विश्वचषकाच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या फिरकीपटूंचा विचार केला, तर ऍडम झॅम्पा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यादीत पहिला क्रमांक श्रीलंकन दिग्गज मुथय्या मुरलीधरन यांचा आहे. मुरलीधरनने 2007 साली विश्वचषक हंगामात एकूण 23 विकेट्स घेतल्या होत्या. यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेल्या झॅम्पाने
वनडे विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारे फिरकी गोलंदाज
23 – मुथय्या मुरलीधरन (2007)
22 – ऍडम झॅम्पा (2023)*
21 – ब्रॅड हॉग (2007)
21 – शाहीद आफ्रिदी (2011)
20 – शेन वॉर्न (1999)
दरम्यान, झॅम्पा या सामन्यातील दोन विकेट्सनंतर चालू विश्वचषक हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज देखील ठरला. त्याने श्रीलंकेच्या दिलशान मदुशंका (21 विकेट्स) याला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला. ऑस्ट्रेलियन संघ आधीच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यामुळे पुढच्या सामन्यात झॅम्पाच्या विकेट्सचा आकडा अजून वाढू शकतो. तसेच नवे विक्रम देखील बनू शकतात. (AUS vs BAN । Zampa becames Most Wicket take by an Aussie spinner in a World Cup Edition.)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानविरुद्धचा सामना माझा कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो, इंग्लंडच्या खेळाडूचं धक्कादायक विधान
शुबमन गिल आणि सारा तेंडुलकरच्या नात्यावर लागली मोहर! खास व्यक्तिने महत्वाची माहिती