ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार हा सामना 11 सप्टेंबर (बुधवार) रोजी खेळला गेला. मालिकेतील या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्याच धर्तीवर संघाचा धुव्वा उडवला. द रोझ बाउल, साउथॅम्प्टन येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 28 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वबाद झाला. पण गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर कांगारुंनी दमदार विजय मिळवला.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी प्रथम करण्याचा निर्णय घेतला. जो त्यांच्यासाठी अजिबात योग्य ठरला नाही. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ 19.3 षटकांत सर्वबाद 179 धावांवर आटोपला. ट्रेव्हिस हेडने संघासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने 23 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 59 धावांची सर्वाधिक मोठी खेळी खेळली. याशिवाय सलामीला आलेल्या मॅथ्यू शॉर्टने 26 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 41 धावा केल्या. तर यजमान संघाकडून गोलंदाजी करताना लियाम लिव्हिंगस्टोनने सर्वाधिक 3 बळी घेतले.
180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा संघ पूर्णपणे निष्फळ दिसत होता. संघ 19.2 षटकात 151 धावांवर ढेपाळला. लियाम लिव्हिंगस्टनने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने 27 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 37 धावा केल्या. याशिवाय संघाचे जवळपास सर्वच फलंदाज फ्लॉप दिसले. संघाचे एकूण पाच फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत.
ऑस्ट्रेलियाकडून सीन ॲबॉटने सर्वाधिक 3 बळी घेतले. यादरम्यान त्याने 3.2 षटकात 28 धावा दिल्या. याशिवाय जोश हेझलवूड आणि ॲडम झाम्पाने 2-2 बळी घेतले. हेझलवूडने 4 षटकात 32 धावा दिल्या आणि झाम्पाने 4 षटकात केवळ 20 धावा दिल्या. रेस्ट झेवियर बार्टलेट, कॅमेरॉन ग्रीन आणि मार्कस स्टॉइनिस यांनी आपल्या खात्यात एक- एक विकेट्स नोंदवल्या.
हेही वाचा-
AFG vs NZ; कसोटीच्या चौथ्या दिवशीही पावसाची सावली, टॉसशिवाय सामना रद्द होणार?
‘रोहित-बुमराह’ नाही तर हा खरा क्रिकेटचा ‘शहेनशाह’, गाैतम गंभीरचे लक्षवेधी वक्तव्य
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टाॅप-5 खेळाडू