---Advertisement---

बटलर-बेअरस्टोसारखे यष्टीरक्षक संघात असताना पोपला करावे लागले यष्टीरक्षण; ‘हे’ आहे कारण

On: शनिवार, जानेवारी 8, 2022 5:31 PM
ollie-pope
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सध्या ऍशेस मालिकेतील (ashes series) चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. उभय संघातीला हा सामना सिडनीमध्ये खेळला जातोय. या सामन्यात असे काही झाले, जे पाहून चाहतेही चकित झाले आहेत. सामन्यादरम्यान इंग्लंड संघाला चौथ्या दिवशी अशा एका खेळाडूला मैदानावर उतरवावे लागले, ज्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली नव्हती.

इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) याला सामन्यादरम्यान डाव्या हाताला दुखापत झाली होती, याच कारणास्तव त्याला यष्टीरक्षण करता आले नाही. ओली पोप (Ollie Pope) याच्या जागी या सामन्यात जॉनी बेअरस्टो (jonny bairstow) याला इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले गेले होते. त्याने मिळालेल्या या संधीचा योग्य फायदा घेत पहिल्या डावात शतकी खेळीदेखील केली. मात्र, यादरम्यान त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली. अशा प्रकारे बटलर आणि बेअरस्टो हे इंग्लंडचे दोन्ही यष्टीरक्षक फलंदाज दुखापतग्रस्त झाले.

तसेच पहिल्या डावात गोलंदाजी करताना दिग्गज बेन स्टोक्सच्या मांसपेशिंमध्येदेखील ताण आला होता. अशात संघातील तीन खेळाडू अनफिट असताना, जेव्हा इंग्लंड दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी उतरला, तेव्हा त्यांनी यष्टीरक्षकाच्या रूपात १२ व्या खेळाडूला संधी दिल्याचे पाहायला मिळाले. प्लेइंग इलेव्हनमधील दोन्ही यष्टीरक्षक फलंदाजांना दुखापत झाल्यामुळे ओली पोप पुन्हा मैदानात परतल्याचे पाहायला मिळाले आणि त्याच्याकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली गेली. इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनाने सांगितले की, जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टो या दोघांना तपासणीसाठी पाठवले गेले आहे आणि सामना संपल्यानंतर त्यांच्या अहवालाचे विश्लेषण केले जाईल.

दरम्यान, सध्या खेळल्या जाणाऱ्या ऍशेसच्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने आठ विकेट्सच्या नुकासानावर ४१६ धावा केल्या आणि डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक १३७ धावांची खेळी केली. तर, दुसरीकडे इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने पहिल्या डावात सर्वाधिक ५ विकेट्स नावावर केल्या

प्रत्युत्तरात इंग्लड संघ पहिल्या डावात २९४ धावांवर गुंडाळला गेला. पहिल्या डावात जॉनी बेअरस्टोने इंग्लंडसाठी सर्वाधिक ११३ धावा ठोकल्या. परंतु, संघ अपेक्षित धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला नाही. ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलँडने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.

महत्वाच्या बातम्या –

दुसरी कसोटी गमावल्यानंतर भारतीय क्रिकेटरला आठवला रहाणे; म्हणाला, ‘राहुलऐवजी त्याला कर्णधार…’

इंग्लंडचा गोलंदाज हॅट्रिकवर असताना ऑस्ट्रेलियाने केला डाव घोषित, सिडनी कसोटीवर यजमानांचे वर्चस्व

खुद्द ब्रँड अँबेसेडर अमिताभ यांनाही मिळाली चुकीची माहिती, ‘या’ लीगमध्ये सहभागी नाही होणार सचिन

व्हिडिओ पाहा –

टोकियो ऑलिम्पिक... भारतीय क्रीडाक्षेत्रात इतिहास घडवणारी स्पर्धा | India at Tokyo Olympics 2020

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---