सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या ४ सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी ही कसोटी मालिका सुरु असून या मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून (७ जानेवारी) सुरु होणार आहे. या सामन्यासाठी बुधवारी(६ जानेवारी) ११ जणांच्या भारतीय संघाची घोषणा झाली आहे.
या संघाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे कायम आहे. तसेच रोहित शर्माचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. तो संघात परतल्याने मयंक अगरवालला बाहेर बसावे लागले आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत रोहित आणि शुबमन गिल सलामीला फलंदाजी करणार आहेत. याबरोबरच रोहित उपकर्णधारपदाची जबाबदारी देखील सांभाळेल.
त्याचबरोबर दुसऱ्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज उमेश यादव दुखापतग्रस्त झाला असल्याने त्याच्या ऐवजी अंतिम ११ जणांच्या संघात नवदीप सैनीला संधी मिळाली आहे. त्यामुळे सैनी कसोटी पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो भारताकडून कसोटी खेळणारा २९९ वा खेळाडू ठरेल.
हे दोनच बदल भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात झाले आहेत. उमेश आणि मयंक वगळता दुसऱ्या सामन्यात खेळलेले सर्व खेळाडू तिसऱ्या सामन्यासाठी संघात कायम आहे.
https://twitter.com/BCCI/status/1346713760363253762
मालिकेतील स्थिती –
तिसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत भक्कम आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा इरादा असणार आहे. कारण या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने तर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता, त्यामुळे ही मालिका सध्या १-१ अशा बरोबरीच्या स्थितीत आहे. यामुळे तिसरा सामना जो संघ जिंकेल, त्या संघावरील मालिका पराभवाचे संकटही टळेल. तसेच जर हा सामना अनिर्णित राहिला तर मालिकेतील चौथा सामना निर्णायक असेल.
असा आहे तिसऱ्या कसोटीसाठी भारताचा अंतिम ११ जणांचा संघ –
रोहित शर्मा (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिषभ पंत(यष्टीरक्षक), हनुमा विहारी, रविंद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी
महत्त्वाच्या बातम्या –
अजिंक्य रहाणेसाठी डोकेदुखी, शार्दुल आणि सैनीपैकी कोणाची करावी निवड?
ऑस्ट्रेलिया-भारत पडले मागे; न्यूझीलंड कसोटीचा नवा किंग
ऑस्ट्रेलियन माध्यमांनी कोहली-पंड्यावर प्रोटोकॉल तोडल्याचा केलेला आरोप कितपत खरा, घ्या जाणून