भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मंगळवारी(19 जानेवारी) झालेल्या चार सामन्याची कसोटी सामन्याची बॉर्डर गावसकर मालिका पार पडली. ब्रिस्बेन येथे झालेल्या चौथ्या सामन्यात भारतीय संघाने 3 विकेट्सने ऑस्ट्रेलिया संघावर विजय मिळवला. त्याचबरोबर भारतीय संघाने 2-1 अशा फरकाने जिंकली. या सामन्यात चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलिया गोलंदाजाचे चेंडूचे वार झेलत अर्धशतकी खेळी साकारत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
भारतीय संघाने ब्रिस्बेन येथील गाबा या मैदानावर तब्बल 32 वर्षांनी विजय मिळवला. या विजयात भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूंने वेगवेगळ्या सत्रात दिमाखदार कामगिरी करत विजय मिळवून दिला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने चेंडूच्या रूपाने जे वार केले, ते सर्व भारतीय संघाची भिंत चेतेश्वर पुजाराने आपल्या अंगावर झेलले. त्यामुळे भारतीय संघाला या सामन्यात धमाकेदार विजय साकारता आला.
भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजाराने 211 चेंडूचा सामना करताना 7 चौकार ठोकत 56 धावा केल्या. त्याचबरोबर त्याने भारतीय संघाची एक बाजू लावून धरताना ऑस्ट्रेलिया गोलंदाजांचे चेंडूच्या रूपाने केलेले तीन अंगावर झेलले. त्यापैकी एक चेंडू त्याच्या हेल्मेटवर लागला. त्याचबरोबर दुसरा चेंडू अंगावर लागून घेतला, तर तिसरा चेंडू मात्र त्याच्या हाताच्या बोटावर लागला. तो चेंडू इतका वेगवान होता की, अक्षरशः त्याच्या बोटातून झणझण्या आल्या. त्यामुळे त्याने बॅट फेकून मैदानावर लोटांगण घातले. येवढे होऊन ही त्याने विकेट्स सोडली नव्हती. मात्र त्यांनंतर 56 धावांवर असताना पॅट कमिन्सने पायचीत केले.
https://twitter.com/7Cricket/status/1351377151283638280
https://twitter.com/cricketcomau/status/1351373219903664129
https://twitter.com/7Cricket/status/1351380829616836609
परंतु, त्यानंतर रिषभ पंत या वादळाने धुडगूस घालत भारतीय संघाला 96.6 षटकांत जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर दमदार विजयी चौकार ठोकत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. रिषभ पंतने 138 चेंडूचा सामना करताना 9 चौकार आणि 1 गगनचुंबी षटकार ठोकत नाबाद 89 धावांची खेळी केली. त्यामुळे भारतीय संघाने हा सामना 3 विकेट्सने जिंकत, बॉर्डर गावसकर मालिका आपल्या नावावर केली.
चार सामन्यातील पहिला सामना एॅडलेड येथे खेळला होता या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवला. त्यांनंतर मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. त्याचबरोबर सिडनीत खेळलेला तिसरा सामना अनिर्णीत राहिला. त्यानंतर आता गाबा येथे खेळलेल्या चौथ्या सामन्यात भारतीय संघाने 3 विकेट्स विजय मिळवला. तसेच बॉर्डर गावसकर मालिका सुद्धा जिंकली.