माजी भारतीय क्रिकेटपटू दिलीप दोशीने कर्णधार विराट कोहली बद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यातनंतर मायदेशी परतला आहे. त्यामुळे या गोष्टीला घेवून सध्या चर्चा सुरू आहे की, विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया दौर्यावरून माघारी यायला हवे होते की नव्हते. दिलीप दोशी यांचे म्हणणे आहे की, जर ते विराट कोहलीच्या जागी असते तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी आले नसते.
दिलीप दोशींनी एका मुलाखतीमध्ये बोलत असताना विराट कोहलीबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मला माहित आहे की, ही नवीन काळाची एक कल्पना आहे ज्याला खुप लोक मानतात. मी ही गोष्ट चांगल्या पद्धतीने समजतो. परंतु जेव्हा तुम्ही राष्ट्रीय कर्तव्यावर असता आणि जर मी विराट कोहलीच्या जागी असतो तर मी कधीच माघारी आलो नसतो. माझ्यासाठी राष्ट्रीय कर्तव्य सर्वात पहिले असते आणि नंतर बाकीचे.”
बीसीसीआय विराटला जाण्यापासून रोखू शकत नाही
दिलीप दोशी पुढे म्हणाले, विराट कोहलीचा हा वैयक्तिक निर्णय होता आणि बीसीसीआय विराटला जाण्यापासून रोखू शकत नाही. दोशी म्हणाले, “तुम्ही कोणाला जाण्यापासून रोखू शकत नाही. क्रिकेट बोर्ड खेळाडूला म्हणू शकत नाही की तुम्ही जाऊ शकत नाही.”
भारतीय संघाला एॅडलेडमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात मिळालेल्या पराभवामुळे बर्याच पद्धतीचे प्रश्न उपस्थित होत आहेत. पहिल्या कसोटीत पहिले दोन दिवस सामन्यावर भारतीय संघाची पकड होती. परंतु तिसर्या दिवशी पहिल्या सत्रात जे काही घडले ते विक्रमी पुस्तकात नोंदवले गेले. भारतीय संघ कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी 36 धावसंख्येवर बाद झाला. त्यामुळे भारतीय संघाला सामना गमवावा लागला. विराट कोहली मायदेशी परतला आहे त्यामुळे भारतीय संघ कमकुवत झाला आहे.
विराट मायदेशी परतला
विराट कोहली पालकत्व रजेवर मायदेशी परतला आहे. विराट कोहलीची अर्धांगिनी अनुष्का शर्मा गरोदर आहे. विराट कोहलीची इच्छा आहे की अनुष्काच्या बाळंतपणाच्या कालावधीत त्याने तिथे उपस्थित असावेत. त्यामुळे विराट कोहली रजा घेवून ऑस्ट्रेलिया दौर्यावरून माघारी परतला आहे.
महत्वाच्या बातम्या:
– बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियावर मात करायची आहे, तर असा सराव करा
– बिग ब्रेकिंग! क्रिकेटपटू सुरेश रैनाला मुंबई पोलिसांकडून अटक, गुन्हाही दाखल
– मिस्टर क्रिकेटने केली पृथ्वी शॉची पाठराखण; मेलबर्न कसोटीत संधी देण्याची मागणी