ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज ब्रॅड हॅडिनने भारताविरुद्ध होणार्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाच्या सलामी फलंदाजीच्या मोठे विधान केले आहे. बर्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती की, ऑस्ट्रेलिया संघासाठी कोण सलामी फलंदाज म्हणून यायला हवे. ब्रॅड हॅडिन यांच्यानुसार जो बर्न्सने ऑस्ट्रेलिया संघासाठी सलामीला यायला पाहिजे आणि फलंदाजीची जबाबदारी स्विकारावी.
डेविड वॉर्नरला जेव्हा दुखापत झाली नव्हती, तेव्हा वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऑस्ट्रेलिया संघाच्या सलामी जोडीसाठी येत होत्या. बर्याच लोकांचे म्हणणे होते की, डेविड वॉर्नर सोबत सलामीला विल पुकोवस्कीने सलामीला यावे. कारण त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन केले आहे. परंतू आता डेविड वॉर्नर आणि विल पुकोवस्की या दोघांना ही दुखापत झाली आहे. त्याचबरोबर जो बर्न्सचा फॉर्म खराब सुरू आहे आणि त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघासाठी अडचणी वाढल्या आहेत.
फॉक्स क्रिकेट सोबत बोलताना ब्रॅड हॅडिन म्हणाले, “मी जो बर्न्सला निवडत आहे. डेविड वॉर्नरला दुखापत झाल्यामुळे सलामीच्या फलंदाजीमध्ये सातत्याची गरज आहे. मला माहित आहे त्याचा फॉर्म खराब आहे,परंतू कधी कधी असे होते आणि जो बर्न्स संघातून आत-बाहेर होत राहतो.”
जस्टीन लॅंगर जो बर्न्सला करू शकतात मदत
ब्रॅड हॅडिन पुढे म्हणाले,” एकदा त्याची संघात निवड झाली की त्याच्याकडे पुनरागमन करण्याची त्याच्याकडे साधने आहेत. ज्यामधून तो पुनरागमन करू शकतो. जस्टीन लॅंगर he त्याला फॉर्ममध्ये परतण्यासाठी मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. कधी – कधी आकडे योग्य गोष्टी दाखवत नाहीत आणि संघातील संबंधाने ही खुप परिणाम पडतो. तुम्हाला सलामी फलंदाजीमध्ये सातत्याची गरज आहे.”
संबंधित बातम्या:
– भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून स्टिव्ह स्मिथ बाहेर? या कारणामुळे अर्ध्यातून सोडले सराव सत्र
– नव्या आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीयांची बल्ले-बल्ले; सहा खेळाडू टॉप टेन मध्ये
– हा संघ जिंकेल २-१ ने मालिका, शेन वॉर्नचे कसोटी मालिकेपूर्वी भाकीत