भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी (29 नोव्हेंबर ) सिडनी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरला या सामन्यात दुखापत झाली. या कारणामुळे तो तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्याला तसेच त्यानंतर होणाऱ्या टी20 मालिकेला मुकणार आहे. आता त्याच्या अनुपस्थितीत सलामीला कोणता फलंदाज येईल? हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. यातच ऑस्ट्रेलियाच्या एका नवोदित खेळाडूने डावाची सुरुवात करण्याची तयारी दर्शवली आहे.
वॉर्नरची दुखापत संघासाठी चांगली बाब नाही
सोमवारी (30 नोव्हेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज मार्नस लाबूशेन म्हणाला की, “भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतील विजयात वॉर्नरचे महत्त्वपूर्ण योगदान होते आणि त्याची दुखापत आमच्या संघासाठी चांगली बाब नाही.”
…तर सलामीला फलंदाजी करण्याची जबाबदारी पार पडायला आवडेल- लाबूशेन
“वॉर्नरच्या अनुपस्थितीत दुसर्या फलंदाजाला वरच्या फळीत आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. जर मला डावाची सुरुवात करण्यास सांगितले, तर ही जबाबदारी पार पाडायला मला आवडेल. तथापि, संघ व्यवस्थापन काय निर्णय घेईल हे पाहावं लागेल,”असेही पुढे बोलताना लाबूशेन म्हणाला
दुखापतीमुळे वॉर्नरने सोडले मैदान
सिडनी येथे खेळल्या गेलेल्या दुसर्या वनडे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना डेविड वॉर्नर जखमी झाला होता आणि त्यानंतर त्याला मैदान सोडून जावे लागले.
वॉर्नरच्या जागी ‘या’ खेळाडूला दिली संधी
दुखापतीमुळे डेविड वॉर्नर भारताविरुद्धच्या उर्वरित तिसऱ्या वनडे सामन्याला आणि आगामी टी20 मालिकेला मुकणार आहे.त्याच्या जागी 30 वर्षीय डॉर्सी शॉर्ट या खेळाडूला संघात स्थान देण्यात आले आहे.
पॅट कमिन्सला विश्रांती देण्याचा निर्णय
त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सलादेखील ऑस्ट्रेलियाच्या संघ व्यवस्थापनाने उर्वरित वनडे सामन्यात आणि टी20 मालिकेसाठी विश्रांती दिली आहे.
कमिन्स आणि वॉर्नर कसोटी मालिकेत महत्वपूर्ण भूमिका पार पाडतील- लँगर
ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर म्हणाले की, “कसोटी मालिकेसाठी पॅट कमिन्स आणि डेविड वॉर्नर महत्वपूर्ण भूमिका पार पडतील. वॉर्नर आपल्या तंदुरुस्तीवर काम करेल. आम्ही पॅट कमिन्सला विश्रांती दिली आहे. जेणेकरून संपूर्ण हंगामासाठी हे दोघेही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहू शकतील. हे दोन खेळाडू सर्वात महत्त्वपूर्ण कसोटी मालिकेसाठी पूर्णपणे तयार व्हावे, हिच आमची प्राथमिकता आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून ही मालिका आणखी महत्त्वाची ठरणार आहे.”
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील कसोटी मालिका 17 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज
“आता मस्का लावू नको”, विराटचे अभिनंदन केल्याबद्दल सूर्यकुमारची चाहत्यांनी उडवली खिल्ली
‘हा’ विक्रम करत कोहलीने धोनीलाही टाकले मागे, दिग्गज कर्णधारांच्या पंक्तीत मिळविले स्थान