---Advertisement---

भारताच्या पराभवानंतर ट्विटरवर मजेशीर मीम्सचा सुळसुळाट, कोहलीला केलं जातंय टार्गेट?

On: सोमवार, नोव्हेंबर 30, 2020 5:27 PM
---Advertisement---

सिडनी येथे झालेल्या दुसर्‍या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ५१ धावांनी पराभूत करत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने धुव्वाधार शतक ठोकले, तर ऍरॉन फिंच, डेविड वॉर्नर, मार्नस लॅब्युशाने आणि ग्लेन मॅक्सवेल यांनीही अर्धशतके झळकावली. सर्व फलंदाजांच्या शानदार खेळ्यांमुळे ऑस्ट्रेलियाने ३८९ धावांचा डोंगर उभा केला होता.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना, कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल यांनी भारतीय संघाला विजयी करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, ते भारताला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. तत्पूर्वी, पुन्हा एकदा खराब गोलंदाजी आणि गचाळ क्षेत्ररक्षण ही भारताच्या पराभवाची प्रमुख कारणे ठरली. दुसर्‍या वनडे सामन्यात पराभूत झाल्यानंतर ट्विटरवर चाहते आणि समीक्षकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या दिसल्या.

भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर ट्विटरवर उमटलेल्या काही प्रमुख प्रतिक्रिया.

भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाणने ट्विट करत म्हटले, ‘भारतीय गोलंदाजांच्या दर्जावर शंका नाही. मात्र, सातत्यावर नक्कीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते. ऑस्ट्रेलियामध्ये योग्य लेंथ लवकर ओळखावी लागते आणि भारतीय गोलंदाज यात अपयशी ठरले.’

माजी भारतीय सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्राने ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याच्या फॉर्मविषयी एका मीमद्वारे भाष्य केले.

प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले त्याने ट्विट करत लिहिले, ‘सामना १०-१२ षटके आधीच संपला होता.’

एका बनावट अकाउंटवरून केल्या गेलेल्या ट्विटमध्ये लिहिले होते, ‘या मालिकेनंतर बीसीसीआयने वेस्ट इंडिजविरुद्ध ५ कसोटी आणि ३ वनडे सामान्यांच्या मालिकेची घोषणा केली आहे. यामागील कारण म्हणजे, कोहलीच्या शतकांचा आकडा ७० च्या पुढे जावा. कोहलीला विश्वचषक आणि आयपीएलपेक्षा द्विपक्षीय मालिका खेळायला आवडते.’

https://twitter.com/Kishu_tweetz/status/1333014774527913985

https://twitter.com/Ki2Vissapragada/status/1332935966877630464

https://twitter.com/Meme_Heist_/status/1332962092245159936

दुसऱ्या एका बनावट ट्विटर अकाउंटवरून एक मीम शेअर केला आहे. ज्यामध्ये कोहलीच्या नेतृत्त्वावर टीका केली गेली. धोनी संघात असताना आणि धोनी संघात नसताना विराटच्या नेतृत्त्वात कसा फरक पडतो, हे यातून दाखवण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“विराटऐवजी रोहितला कर्णधार करण्याची वेळ आली?”, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

“वॉर्नर दीर्घकाळ दुखापतग्रस्त राहिल्यास भारतीय संघाला फायदाच होईल”

“पंड्याच्या गोलंदाजीमुळे ब्लुप्रिंट मिळाली”, भारताविरुद्धच्या विजयानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधाराचा खुलासा

ट्रेंडिंग लेख-

भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज

या ५ कारणांमुळे भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात पराभव

क्रिकेट जगतातील ५ सर्वोत्तम गोलंदाजी ‘रन-अप’, घातक गोलंदाजीसाठी व्हायची मदत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---