---Advertisement---

आला रे आला! हिटमॅन पोहोचला ऑस्ट्रेलियात, सोशल मिडीयावरून दिली माहिती

On: बुधवार, डिसेंबर 16, 2020 4:41 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा सलामी फलंदाज रोहित शर्मा कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात पोहचला आहे. आता तो 14 दिवसांसाठी क्वारंटाइनमध्ये असणार आहे. तो फक्त शेवटच्या दोन सामन्यासाठी उपलब्ध असेल. त्याला दुखापत झाली होती होती. त्यामुळे त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत भाग घेतला नव्हता.रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात पोहचला आहे आणि त्याने सोशल मीडियावर आपला एक फोटो शेअर केला आहे.

रोहित पहिल्या दोन सामन्यांना मुकणार 
रोहित शर्मा भले ही ऑस्ट्रेलियामध्ये पोहचला आहे. परंतू तो पहिल्या दोन सामन्यात सहभागी होणार नाही. कारण त्याला 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना 17 डिसेंबर पासून खेळला जाईल. त्यानंतर दुसरा सामना 26 डिसेंबर पासून खेळला जाणार आहे. तोपर्यंत रोहित शर्मा क्वारंटाइनमध्ये राहणार आहे.
ऑस्ट्रेलियात आयसोलेशन कालावधीमध्ये रोहित शर्मा त्याच्या फिटनेसवर काम करणार आहे. त्याला फिटनेसवर काम करण्यासाठी एक कार्यक्रम दिला गेला आहे. त्या हिशेबाने तो फिटनेसवर काम करेल. त्याच्यानंतर त्याची पुन्हा त्याची फिटनेस टेस्ट होईल. तेव्हा तो खेळेल की नाही हे चित्र स्पष्ट होईल.

रोहित शर्मा

परंतु मागील एक महिन्यापासून रोहित शर्मा बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेसवर मेहनत घेत होता. त्यानंतर त्याने फिटनेस टेस्ट सुद्धा दिली होती. ज्यामध्ये तो पास झाला होता आणि ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला. विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे. अशात भारतीय संघात रोहित शर्मा असणे गरजेचे आहे.
ऑस्ट्रेलियाच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर रोहित शर्माची बॅट चालू शकते. तो अशा प्रकारच्या खेळपट्टीवर खेळणे पसंत करतो. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर दडपण टाकण्यासाठी रोहित सक्षम आहे. त्याच्या येण्याने भारतीय संघ मजबुत झाला आहे.

संबधित बातम्या:
– बिग ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय प्लेईंग इलेव्हनची घोषणा; या खेळाडूला मिळाली संधी
– अख्खा पब्लिक जानता है कौन आने वाला है..! रोहित ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्यानंतर सोशल मीडियावर भन्नाट मिम्सचा वर्षाव
– अब आयेगा मजा! रोहित झाला ऑस्ट्रेलियाला रवाना; खेळणार इतके कसोटी सामने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---