---Advertisement---

शेवटचा वनडे सामना खेळणाऱ्या फिंचवर साउदीने नाही दाखवली दया, पाहा कसा उडवला त्रिफळा

On: रविवार, सप्टेंबर 11, 2022 3:34 PM
David-Waner-and-Aaron-Finch
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच त्याच्या एकदिवसीय क्रिकेटमधील शेवटच्या सामन्यात मोठी खेळी करू शकला नाही. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात फिंच फक्त 5 धावा करून बाद झाला. वेगवान गोलंदाज टिम साउदी याने त्याला क्लिन बोल्ड केले. उभय संघात खेलळ्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील हा शेवटचाच सामना होता. 

दरम्यान, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जोश इगलिस (Josh Inglis ) आणि कर्णधार एरॉन फिंच (Aaron Finch) ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आले.  कारकिर्दीतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात फिंचला न्यूझीलंडच्या खेळाडूंकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ मिळाला. परंतु या महत्वाच्या सामन्यात त्याला अपेक्षित प्रदर्शन मात्र करता आले नाही.

न्यूझीलंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज टिम साउदी (Tim Southee) याने फिंचला क्लीन बोल्ड केले. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 6 व्या षटकात साउदी गोलंदाजीसाठी आला. या षटकातील चौथ्या चेंडू साउदीने जबरदस्त इनस्वींग टाकला, ज्याचा अंदाज फिंचला लावता आला नाही. चेंडू थेट स्टंप्समध्ये घुसल्यानंतर फिंचला मैदान सोडावे लागले. त्याने 13 चेंडूत 5 धावा करून विकेट गमावली. पवेलियनकडे जात असताना त्याने बॅट हवेत उचलून चाहत्यांना अभिवादन केले. दरम्यान, मागच्या मोठ्या काळापासून अपेक्षित प्रदर्शन करताय येत नसल्यामुळेच फिंचने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी, तो टी-20 फॉरमॅटमध्ये मात्र ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधारपदावर कायम असेल. काही दिवसांमध्येच तो टी-20 मालिका खेळण्यासाठी भारत दौरा करणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमिवार ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्वाची असेल.

फिंचच्या एकदिवसीय कारकिर्दीतवर एक नजर टाकली, तर त्याने 146 सामन्यांमध्ये 5406 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर एकूण 129 षटकार आहेत. त्याने या धावा 17 शतक आणि 30 अर्धशतकांच्या जोरावर केल्या आहेत. ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक शतके करणाऱ्यांच्या यादीत फिंच चौथ्या क्रमांकावर आहे. रिकी पॉंटिंग, डेविड वॉर्नर मार्क वॉ यांच्यानंतर त्याचा क्रमांक येतो.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

स्टुअर्ट बिन्नीच्या झंझावाती खेळीने पत्नी झाली इंप्रेस, मयंती लँगरने असा व्यक्त केला आनंद
VIDEO: शेवटच्या सामन्यात अशा प्रकारे बाद झाला फिंच! अजूनही सामन्यात करू शकतो विशेष कामगिरी
टी-२० विश्वचषकात बुमराह आणि हर्षल पटेल खेळणार! दोघांनी मिळवलीये फूल फिटनेस  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---