---Advertisement---

वाढदिवसाच्या दिवशी हॅट्रिक घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या या गोलंदाजाचा क्रिकेटला अलविदा

---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पीटर सीडलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या वृत्तानुसार त्याने आपल्या जीवनातील हा मोठा निर्णय ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यातील चौथा दिवस सुरू होणाच्या आधी घेतला.

सीडलने 2008 मध्ये भारताविरूद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. त्याने 11 वर्षांच्या कारकिर्दीत आतापर्यंत ऑस्ट्रेलियाकडून 67 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 221 विकेट्स घेतल्या आहेत. तो ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा 13वा गोलंदाज आहेे.

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा तो शेवटचा गोलंदाज आहे. त्याने ही हॅट्रिक 2010 ला झालेल्या ऍशेस मालिकेत आपल्या वाढदिवसाच्या दिवशी गाबा येथे इंग्लड विरूद्ध घेतली होती. त्याने हॅट्रिक घेताना ऍलिस्टर कूक, मॅट प्रायर आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना बाद केले होते.

त्याच्या निवृत्तीबद्दल तो म्हणाला, ‘ऑस्ट्रेलियाकडून खेळताना, मैदानावर उतरताना, बॅगी ग्रीन कॅप घालणे शानदार होते. मी पंटर (रिकी पॉन्टिंग), स्टीव्ह वॉसारख्या खेळाडूंना ही कॅप घालताना आणि ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना पाहिले आहे.’

तो पुढे म्हणाला, ‘मी जेव्हाही मैदानात उतरलो तो एक शानदार अनुभव होता. मला वाटत नाही की मी एखाद्या विशेष क्षणाची निवड करु शकेल. अखेर जे खेळलो ते खास होते. मी जेवढे खेळलो ते खरंच विशेष होते.’

सीडलने 2009 मध्ये वनडे सामन्यात पदार्पण केले होते. त्याने ऑस्ट्रेलियासाठी 20 वनडे सामने खेळले आहेत. त्याने आपला शेवटचा वनडे सामना 2019 मध्ये भारताविरूद्ध खेळला होता. त्याने वनडेमध्ये 17 विकेट्स घेतले आहे.

आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पीटरने केवळ 2 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 3 विकेट्स घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---