बलाढ्य न्यूझीलंड संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये सुरुवात केली. त्यांनी पहिले चारही सामने आपल्या खिशात घातले. मात्र, त्यानंतर त्यांची गाडी रुळावरून घसरली. त्यांना पाचव्या सामन्यात भारताने आणि आता सहाव्या सामन्यात शनिवारी (दि. 28 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाकडून निसटच्या पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 5 धावांनी विजय झाला. सलग दुसरा सामना गमावल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमची प्रतिक्रिया समोर आली. यावेळी त्याने खेळाडूंचे जोरदार कौतुक केले.
‘नक्कीच दु:खद आहे’
ऑस्ट्रेलिया संघाकडून 5 धावांनी नजीकचा पराभव स्वीकारल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम (Tom Latham) हुंकरला. तो म्हणाला, “क्रिकेटचा शानदार खेळ, संपूर्ण 100 षटकांपर्यंत चढ-उताराचा राहिला. इतके जवळ येणे नक्कीच दु:खद आहे. मात्र, एक शानदार खेळ आहे. त्यांनी आम्हाला पिछाडीवर टाकले आणि त्यावेळी त्यांना रोखणे आणि विकेट घेण्याची बाब होती.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “ग्लेन फिलिप्सने चांगली गोलंदाजी केली. 10 षटके गोलंदाजी करणे आणि त्या स्थितीत 3 विकेट्स घेणे वास्तवात महत्त्वाचे होते. हे पाहून चांगले वाटले की, तो जे काम करत आहे आणि त्याचे फळही त्याला मिळत आहे.”
‘विश्वचषक घरी…’
“सलामी फलंदाजांनी आम्हाला चांगली सुरुवात करून दिली. रचिनने शानदार खेळी केली. आव्हानाचा पाठलाग करताना केल्या जाणाऱ्या दिसणाऱ्या महत्त्वाच्या खेळींपैकी ही एक शानदार खेळी आहे. हा खूपच चांगला प्रयत्न होता आणि लोकांना याचा अभिमान आहे. ही क्रिकेट खेळण्यासाठी एक चांगली जागा आहे. मला न्यूझीलंडच्या रग्बी संघाला शुभेच्छा देऊ इच्छितो, ज्यांचा अंतिम सामना पाहण्यासाठी आम्ही प्रतीक्षा करू शकत नाही. आशा आहे की ते विश्वचषक घरी आणतील.”
सामन्याचा आढावा
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने सर्वबाद 388 धावांचा डोंगर उभारला होता. या धावा करताना ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेड याने सर्वाधिक 109 धावांची खेळी केली होती. त्याच्याव्यतिरिक्त डेविड वॉर्नर यानेही 81 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. तसेच, आव्हानाचा पाठलाग करताना रचिन रवींद्र याने 116 धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त डॅरिल मिचेल यानेही 54 धावांचे योगदान दिले. तसेच, जेम्स नीशम यानेही 58 धावा केल्या. मात्र, तो आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. अशात न्यूझीलंडला हा सामना 5 धावांनी गमवावा लागला. या सामन्यात कर्णधार लॅथमने पुन्हा निराश केले. त्याने 22 चेंडूत फक्त 21 धावा केल्या. (aus vs nz odi world cup 2023 we are hopefull to win world cup said tom latham after 5 runs defeat vs australia)
हेही वाचा-
ऑरेंज आर्मीची जय! नेदरलँड्सकडून बांगला टायगर्सची शिकार, बांगलादेश वर्ल्डकपमधून आऊट
धरमशालेत लिहला गेला नवा इतिहास! 48 वर्षातील ‘तो’ पराक्रम आता ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या नावे