धरमशालेत लिहला गेला नवा इतिहास! 48 वर्षातील ‘तो’ पराक्रम आता ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या नावे

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील सर्वात थरारक सामना खेळला गेला. धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 5 धावांनी निसटता विजय मिळवला. न्यूझीलंड संघाने 289 धावांचा पाठलाग करताना अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. या मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या सामन्यात विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठा विक्रम ही जमा झाला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी अगदी पहिल्या चेंडूपासून तुफानी फटकेबाजी सुरू केली होती. ट्रेविस हेड व डेव्हिड वॉर्नर यांनी 175 धावांची सलामी दिली होती. त्यानंतर इतर फलंदाजांनी उपयुक्त खेळ्या करत ऑस्ट्रेलियाला 388 अशी मोठी मजल मारून दिली. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने सलग तिसऱ्या सामन्यात 350 पेक्षा जास्त धावा केल्या.
या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष केला.रचिन रवींद्र याने झळकावलेले शतक व त्याला डेरिल मिचेल व जिमी निशाम यांनी दिलेल्या साथीमुळे न्यूझीलंड संघ 383 पर्यंत पोहोचू शकला. यामुळे या सामन्यात दोन्ही संघांच्या नावे एक मोठा पराक्रमही नोंद झाला.
वनडे विश्वचषकाच्या 48 वर्षांच्या इतिहासात या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून सर्वाधिक धावा केल्या. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून तब्बल 771 धावा जमा केल्या. यापूर्वी विश्वचषकातील हा विक्रम याच विश्वचषकात दक्षिण आफ्रिका व श्रीलंकेने केला होता. दिल्ली येथे झालेल्या या सामन्यात तब्बल 754 धावा निघाल्या होत्या.
वनडे क्रिकेट इतिहासातील एका सामन्यात सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या नावे आहेत. या दोन्ही संघांनी 2006 मध्ये जोहान्सबर्ग येथे झालेल्या सामन्यात 872 धावा केल्या होत्या. यावेळी दक्षिण आफ्रिकेने 436 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.
(Australia v Newzealand Match Scored Most Aggregate Runs In ODI World Cup History)
महत्वाच्या बातम्या –
लहान मुलांनी लुटला श्रीलंकेच्या खेळाडूंसोबत खेळण्याचा आनंद
थरारक सामन्यात ऑस्ट्रेलिया 5 धावांनी विजयी, 389 चा पाठलाग करताना रचिन-निशामची झुंज अपयशी