पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी वनडे विश्वचषक 2023 मध्ये चांगले प्रदर्शन करत आहे. शुक्रवारी (27 ऑक्टोबर) पाकिस्तान संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या एका विकेटने पराभव स्वीकारावा लागला. शाहीनने या सामन्यात पाकिस्तानसाठी सर्वोत्तम गोलंदाजी केली पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अशातच त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाकिस्तान संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 46.4 षटकांमध्ये 270 धावा करून बाद झाला. शेवटच्या काही षटकांमध्ये त्यांना धावा करता आल्या नाहीत, जे पाकिस्तानच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. 271 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या दक्षिण आफ्रिका संघआने 47.2 षटकांमध्ये 9 विकेट्सच्या नुकसानावर विजय मिळवला. ऍडेन मार्करम याने सर्वाधिक 91 धावांचे योगदान आफ्रिकेच्या विजयासाठी दिले. तसेच सामनावारी पुरस्कार जिंकणाऱ्या तबरेज शम्सी याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
पाकिस्तानसाठी शाहीन आफ्रिदी याने 45 धावा खर्च करून तीन महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या होत्या. तसेच हॅरिस रौफ, मोहम्मद वसीम, उसामा मीर यांनीही प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, तरीही संघ विजय मिळवू शकला नाही. पराभवानंतर पाकिस्तान संघ उपांत्य सामन्याच्या शर्यतीतून जवळपास बाहेर झाल्याचे बोलले जात आहे. याच कारणास्तव हा पहाभव शाहीनच्या मनाला चांगलाच लागल्याचे दिसले. सामना संपल्यानंतर शाहीन आफ्रिदी डकआऊटमध्ये डोळ्यांतील पाणी रोखू शकला नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, शाहीनेच विश्वचषकातील एकदंरीत प्रदर्शन पाहिले, तर यावर्षी खेळलेल्या सहा सामन्यांमध्ये त्याने 13 विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तान संघाने या सहा पैकी फक्त दोन सामने जिंकले असून मागच्या सलग चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. दुसरीकडे दक्षिण आप्रिका संघ सहा पैकी पाच विजय मिळवून शुक्रवारी गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता. (Shaheen Afridi cried after the defeat against South Africa)
महत्वाच्या बातम्या –
लहान मुलांनी लुटला श्रीलंकेच्या खेळाडूंसोबत खेळण्याचा आनंद
थरारक सामन्यात ऑस्ट्रेलिया 5 धावांनी विजयी, 389 चा पाठलाग करताना रचिन-निशामची झुंज अपयशी