AUSvsPAK 2nd Test: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड येथे पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 79 धावांनी विजय झाला. पाकिस्तानला पराभवाचा धक्का देत ऑस्ट्रेलियाने 2-0ने मालिकेत आघाडी घेतली. या सामन्याचा शिल्पकार कर्णधार पॅट कमिन्स ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय
मेलबर्न कसोटीच्या (Melbourne Test) चौथ्या दिवशी यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने पाकिस्तान (Pakistan) संघाला विजयासाठी 317 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ 237 धावांवरच सर्वबाद झाला. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने दुसऱ्या डावातही विकेट्सचे पंचक पूर्ण केले. त्याने या सामन्यात एकूण 10 विकेट्स नावावर केल्या.
ऑस्ट्रेलिया संघाने तिसऱ्या दिवसाची सुरुवात 6 विकेट्सच्या नुकसानीवर 187 धावांनी केली होती. ऍलेक्स कॅरे (Alex Carey) याने तळातील फलंदाजांसोबत दुसऱ्या डावाची धावसंख्या 262पर्यंत पोहोचवली. कॅरेने 53 धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तानपुढे विजयासाठी 317 धावांचे आव्हान ठेवण्यात यशस्वी झाला.
पाकिस्तानचा दुसरा डाव
पाकिस्तानच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही निराश केले. कर्णधार शान मसूद (60) आणि आगा सलमान (50) यांना वगळता इतर कोणताही फलंदाज 50 धावांचा आकडाही पार करू शकला नाही. बाबर आणि रिझवानसारख्या खेळाडूंना चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र, त्यांना ही धावसंख्या मोठ्या धावसंख्येत बदलता आली नाही.
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात मार्नस लॅब्युशेन याच्या अर्धशतकाच्या जोरावर 318 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ 264 धावांवर सर्वबाद झाला होता. त्यामुळे यजमान संघाला 54 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात मिचेल मार्श (Mitchell Marsh) याच्या 96, स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याच्या 50 आणि कॅरेच्या 53 धावांच्या जोरावर 262 धावा केल्या होत्या. (aus vs pak 2nd test match australia won by 79 runs against pakistan 4th day boxing day test at melbourne cricket ground )
हेही वाचा-
शमीची रिप्लेसमेंट मिळाली रे! दुसऱ्या कसोटीसाठी खुंखार गोलंदाज टीम इंडियात सामील, आफ्रिकेसाठी धोक्याची घंटा
टीम इंडियाच्या पराभवामुळे WTC Points Tableमध्ये मोठा बदल, रोहितसेनेची टॉपवरून थेट ‘या’ स्थानी घसरण