पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा संपला आहे. या दौऱ्यावर पाकिस्तानी संघाची कामगिरी अत्यंत खराब राहिली आणि संघाने तीन सामन्यांची कसोटी मालिका 3-0 अशी गमावली. सिडनी येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानी संघ पुनरागमन करेल आणि एक सामना जिंकेल, अशी आशा पाकिस्तानी चाहत्यांना होती, मात्र, तसे होऊ शकले नाही आणि तिसऱ्या सामन्यातही संघाचा पराभव झाला. या संपूर्ण दौऱ्यात पाकिस्तान संघाचे क्षेत्ररक्षण खूपच सरासरीचे होते. एका चाहत्याने संघाच्या या क्षेत्ररक्षणाची खिल्ली उडवली, त्यामुळे पाकिस्तानी खेळाडू हसन अली संतापला.
सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यानंतर पाकिस्तान संघाचा स्टार वेगवान गोलंदाज हसन अली (Hasan Ali) चाहत्यांना ऑटोग्राफ देताना दिसत आहे. त्यानंतर चाहत्यांच्या गर्दीतून एका चाहत्याने हसन अलीच्या क्षेत्ररक्षणाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. तो चाहता म्हणाला, “अरे हसन अली, इकडे ये मी तुला चेंडू पकडायला शिकवतो”. यानंतर हसन अली चांगलाच संतापतो आणि चाहत्यांच्या गर्दीजवळ जाऊन म्हणतो, “ठीक आहे, इकडे ये, कोण शिकवेल मला चेंडू पकडायला?”
A Pakistani fan to Hasan Ali
"Let me teach you how to catch a ball."#PAKvsNZ #PakistanCricketTeam pic.twitter.com/ZOBHicClqC
— Anas Kamboh (@Akcricket3) January 7, 2024
हसन अलीच्या रागाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्या चाहत्यावर राग व्यक्त केला आहे. ज्याने हसन अलीसोबत असे वागण्याचा प्रयत्न केला.
पाकिस्तानचा स्टार गोलंदाज हसन अलीसाठीही ऑस्ट्रेलिया दौरा काही खास नव्हता. या मालिकेत त्याला फक्त 2 विकेट्स मिळाल्या. हसन अली बऱ्याच दिवसांपासून त्याच्या गोलंदाजी फॉर्मशी झुंजत आहे. ऑस्ट्रेलियानंतर हसन अलीला न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी संघात स्थान मिळालेले नाही. (AUS vs PAK Fan mocks Hasan Ali’s fielding angry cricketer gives sharp reply)
हेही वाचा
BREAKING: अर्जुन पुरस्कार मिळवणारा मोहम्मद शमी बनला 58 वा क्रिकेटपटू, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केला गौरव
Photos: स्टेडियमची अवस्था पाहून चाहत्यांमध्ये संभ्रम, भारत-पाक टी20 विश्वचषक सामना कसा होणार?