ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUSvSA)यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. यातील शेवटचा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला, ज्याचा निकाल सामन्याच्या पाचव्या दिवशी रविवारी (8 जानेवारी)अनिर्णीत असा लागला. यामुळे ऑस्ट्रेलियाचे मालिका 3-0 अशी जिंकण्याचे स्वप्न भंग झाले. भारत आणि श्रीलंकेला मात्र याचा फायदा झाला आहे. तसेच पावसामुळे या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एकही चेंडू खेळता आला नाही.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. सलामीवीर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याने नाबाद 195 धावा केल्या. तसेच स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने 104 धावा केल्या. मार्नस लॅब्यूशेन 79 धावा आणि ट्रेविस हेड 70 धावा करत बाद झाले. यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिला डाव चौथ्या दिवशी 4 बाद 475 धावांवर असताना घोषित केला.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव जोश हेझलवूडमुळे 255 धावांतच संपुष्टात आला. यामुळे त्यांना फॉलोऑन मिळाला. हेझलवूडने दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात 2.10च्या इकॉनॉमी रेटने धावा देत 4 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने 3 विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव पाचव्या दिवसाच्या अखेरीस 2 बाद 106 धावा असा राहिला.
All over at the SCG as Australia and South Africa share the spoils to draw the third and final Test of the series.#WTC23 | #AUSvSA
📝 https://t.co/yJR6DiH5jX pic.twitter.com/hFO51iWOYT
— ICC (@ICC) January 8, 2023
या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स, दुसरा सामना एक डाव आणि 182 धावांनी जिंकला. तिसरा सामना दक्षिण आफ्रिकेने अनिर्णीत राखल्याने ऑस्ट्रेलियाला नुकसान तर भारत आणि श्रीलंकेला फायदा झाला आहे. जर का सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला असता तर पूर्ण पॉइंट्स ऑस्ट्रेलियालाच मिळाले असते. आता हा सामना अनिर्णीत राहिल्याने दोन्ही संघांना वाटून पॉइंट्स दिले गेले. ज्याचा परिणाम कसोटी चॅम्पियनशीपच्या टक्केवारीवर झाला आहे.
सिडनी कसोटीनंतर आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशीप 2021-23च्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया 75.56 टक्क्यांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. भारत 58.93 टक्क्यांसह दुसऱ्या आणि श्रीलंका 53.33 टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचे 48.72 टक्के झाले आहेत. त्यांना आता अंतिम फेरी गाठण्यासाठी दुसऱ्या संघावर अवलबूंन राहावे लागणार आहे.
भारताला घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली आहे. यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताचे कसोटी चॅम्पियनशीप 2021-23च्या अंतिम सामन्यात जाण्याच्या आशा आणखी बळावल्या आहेत.
(AUS vs SA Sydney Test Draw proves a World Test Championship boost for India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शाकिब काय सुधारणार नाही! लाईव्ह सामन्यात रागारागात बॅट घेऊन अंपायरकडे धावला
भावनेच्या भरात चहलकडून हद्दच पार! थेट सूर्यासोबत केले असे काही, डिलीट व्हायच्या आत पाहा व्हिडिओ