वनडे विश्वचषक 2023 सध्या रंगात आहे. विश्वचषकातील 10वा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. पाच वेळा विश्वचषक जिंकलेल्या ऑस्ट्रेलियासाठी यावर्षीच्या विश्वचषकाची सुरुवात निराशाजनक राहिली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना गुरुवारी (12 ऑक्टोबर) 134 धावांनी पराभव मिळाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या दोन विकेट्समुळे वाद निर्माण झाला. आफ्रिकी संघाच्या विजायत देखील या दोन विकेट्स महत्वाच्या ठरल्या.
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने 7 विकेट्सच्या नुकसानावर 311 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघ 40.5 षटकांमध्ये 177 धावांवर गुंडाळला गेला. ऑस्ट्रेलियाच्या डावातील स्टीव स्मिथ (Steve Smith) वैयक्तिक 19 धावा करून पायचीत झाला. तिसऱ्यां पंचांनी दिलेला हा निर्णय अनेकांना मान्य नसल्याचे दिसले. सोबतच 18व्या षटकात मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) याची विकेट देखील वादाचे कारण ठरली. स्टॉयनिलने यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) याच्या हातात झेल दिल्याने वैयक्तिक 5 धावा करून त्याला मैदान सोडावे लागले.
स्मिथची विकेट कागिसो रबाडा (Kagiso Rabada) याला मिळाली. रबाडाने टाकलेल्या चेंडू स्मितच्या पॅडवर लागला. पण पहिल्यांदा पाहिल्यानंतर मैदानी पंचांनाही स्मिथ बाद नसल्याची खात्री होती. पण दक्षिण आफ्रिकी संघाला स्मिथ बाद असू शकतो, असे वाटले आणि त्यांना डीआरएस घेतला. आफ्रिकी संघाचा हा निर्णय बरोबर ठरला आणि तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहिल्यानंतर स्मिथला बाद घोषित केले. या निर्णयानंतर स्वतः स्मिथ, नॉन स्ट्राईक एंडवरील मार्नस लॅबुशेन आणि मैदाना पंच देखील हैराण दिसले. सोशल मीडियावर चाहत्यांकडून डीआरएसमध्ये काहीतरी गडबड असल्याचे बोलले जात आहे.
That cannot be out..there is something wrong with DRS. If you look at the live image and the image of DRS, you can see the difference. The offstump is visible on the live one where as in the DRS image, its fully covered. #SAvsAUS #SteveSmith #DRS pic.twitter.com/SCz7pQNL52
— Sachin (@MrLeochin) October 12, 2023
दुसरीकडे स्टॉयनिसच्या रुपात ऑस्ट्रेलियन संघाला सहावा झटका बसला. त्यावेळी संघाची धावसंख्या अवघी 70 होती. यावेळीही गोलंदाज रबाडाच होता. 18व्या षटकातील दुसरा चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकच्या हातात पोहोचला. आफ्रिकी खेळाडूंकडून कट बिहाइंडची अपील केली गेली. पण मैदनी पंच निर्णय देण्यासाठी आश्वस्त नव्हते, ज्यामुळे त्यांनी तिसऱ्या पंचांकडे धाव घेतली. तिसऱ्या पंचांना रिप्लेमध्ये दिसले की, चेंडू स्टॉयनिसच्या जवळून जात असताना त्याच्या ग्लव्जला स्पर्श झाला होता. पण दुसरीकडे चेंडू ज्या ग्लव्जला लागला, तो हात बॅटपासून लांब असल्याचेही दिसले. नियमांनुसार अशा प्रसंग फलंदाजाला नाबाद करार देणे अपेक्षित असते. मात्र, तिसऱ्या पंचांच्या मते चेंडू आणि ग्लव्ज यांच्यात संपर्क आला, तेव्हा बॅट देखील त्या ग्लव्जच्या संपर्कात होती. परिणामी स्टॉयनिसला मैदान सोडावे लागले. अष्टपैलू खेळाडू तिसऱ्या पंचांशी सहमत नसल्यामुळे मैदान सोडण्याआधी त्याने पंचांशी दीर्घ चर्चा देखील केली.
What do you think guys?? Out or Not Out??..????????
Feat. Stoinis pic.twitter.com/FTauRsYHGS— Shawstopper (@shawstopper_100) October 12, 2023
(AUS vs SA । The wickets of Steve Smith and Marcus Stoinis sparked a new controversy)
महत्वाच्या बातम्या –
IND vs PAK Pitch Report: अहमदाबादमध्ये होणार भारत-पाकिस्तान महामुकाबला, कुणाला मिळणार खेळपट्टीची साथ?
विलियम्सन इज बॅक! बांगलादेशविरुद्ध कॅप्टनने जिंकली नाणेफेक, संघात ‘या’ बदलासह न्यूझीलंड करणार गोलंदाजी






