---Advertisement---

ऑस्ट्रेलियाची शानदार विजयी परतफेड; श्रीलंकेचा केला घरात घुसून अपमान

---Advertisement---

ऑस्ट्रेलियाने दुसरा कसोटी सामना 9 विकेट्सने जिंकत श्रीलंकेला दोन सामन्यांच्या मालिकेत व्हाईटवॉश दिला. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त 75 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी केवळ 1 विकेट गमावून सहज पूर्ण केले. याआधी, पहिल्या कसोटीत श्रीलंकेला एक डाव आणि 242 धावांनी पराभव पत्करावा लागला, जो त्यांच्या कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठ्या पराभवांपैकी एक ठरला.

ऑस्ट्रेलियाने शेवटची कसोटी मालिका श्रीलंकेत 2011 मध्ये जिंकली होती, जेव्हा त्यांनी तीन सामन्यांची मालिका 1-0 ने आपल्या नावावर केली होती. त्यामुळे, ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेत येऊन पुन्हा कसोटी मालिका जिंकण्यासाठी तब्बल 14 वर्षे वाट पाहावी लागली. 2016 मध्ये स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेत 3-0 असा क्लीन स्वीप केला होता, तर 2022 मधील मालिका 1-1 अशी ड्रॉ झाली होती.

पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्टीव्ह स्मिथने मालिका जिंकून सुटकेचा नि:श्वास सोडला. याच सामन्यात त्याने कसोटी क्रिकेटमधील आपला 200 वा झेल घेतला. या आधी केवळ जॅक कॅलिस, महेला जयवर्धने, राहुल द्रविड आणि जो रूट या चार खेळाडूंनीच ही कामगिरी केली होती.

ऑस्ट्रेलियाने हा सलग चौथा कसोटी विजय मिळवला, तर श्रीलंकेला सलग चौथा पराभव पत्करावा लागला आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जूनमध्ये खेळला जाणार आहे.

ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कुहनेमनने 63 धावांत 4 बळी घेतले, तर नॅथन लायनने 84 धावांत 4 बळी घेतले. 75 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, ट्रॅव्हिस हेड (20) आणि उस्मान ख्वाजाने सात षटकांत 38 धावा करत चांगली सुरुवात केली. प्रभात जयसूर्याने हेडला पॅव्हेलियनमध्ये पाठवल्यानंतर, ख्वाजाने मार्नस लाबुशेनसोबत 37 धावांची नाबाद भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.

हेही वाचा :
टीम इंडियात नवा सुपरस्टार; ‘या’ खेळाडूला मिळाली पदार्पणाची संधी
IND vs ENG; इंग्लंडनं जिंकला टाॅस, फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का! रचिन रवींद्र भर मैदानात रक्तबंबाळ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---