---Advertisement---

श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला लोळवले, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कांगारु संघाला 2-0 ने व्हाईटवाॅश!

---Advertisement---

येत्या 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होणार आहे, पण या मेगा इव्हेंटपूर्वी श्रीलंकेने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करून धक्का दिला आहे. श्रीलंकेला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टॉप-8 संघांमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. या आयसीसी मेगा स्पर्धेपूर्वी, श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय मालिकेत 2-0 ने हरवून निश्चितच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंकेने कांगारूंना एकदिवसीय सामन्यात व्हाईटवॉश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, कुसल मेंडिसच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियासमोर 282 धावांचे लक्ष्य ठेवले, ज्याला प्रत्युत्तर म्हणून कांगारू फक्त 107 धावांवर सर्वबाद झाले. श्रीलंकेने हा सामना 174 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंकेचा हा सर्वात मोठा विजय आहे. यजमान संघाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा हा दुसरा सर्वात कमी धावसंख्या आहे. 2013 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कांगारू संघ फक्त 74 धावांवर ऑलआउट झाला होता.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, श्रीलंकेच्या विजयाचा नायक यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिस होता. ज्याने 101 धावांची शानदार खेळी करत एक शानदार शतक ठोकले. त्याच्या खेळीच्या जोरावर यजमान संघाने निर्धारित 50 षटकांत 4 गडी गमावून 281 धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार चारिथ अस्लंकानेही 78 धावांची शानदार खेळी खेळली.

282 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवातीपासूनच निराशाजनक दिसत होती. 33 धावांत 3 विकेट गमावल्यानंतर, कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि जोश इंग्लिश यांनी काही काळ डाव सांभाळला पण 79 धावांवर ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का लागताच संघ पत्त्यांच्या घरासारखा कोसळला. यानंतर एकाही पाहुण्या फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. तसेच कांगारुंचा हा अशियातील सर्वात मोठा वनडे पराभव आहे.

हेही वाचा-

WPL 2025 ची सनसनाटी सुरुवात, पहिल्याच सामन्यात धावांचा हाहाकार!
आयपीएलचा प्रभाव प्रचंड! आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या बक्षीस रकमेलाही मागे टाकले!
घरच्या मैदानावर पाकिस्तानची नामुष्की! तिरंगी मालिकेच्या अंतिम लढतीत दारुण पराभव

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---