महिला टी20 विश्वचषक इतिहासातील सर्वात यशस्वी आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने सध्याच्या आशियाई चॅम्पियन श्रीलंकेचा पराभव करून आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली आहे.
गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने यंदाच्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धेतील शनिवारी (5 ऑक्टोबर) पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव करत शानदार विजय मिळवला आहे. वेगवान गोलंदाज मेगन शुटच्या शानदार गोलंदाजीमुळ श्रीलंकेला मर्यादित 20 ओव्हर्समध्ये सात विकेट्सवर केवळ 93 धावा करता आल्या.
धावांचा पाठलग करताना ऑस्ट्रेलियाने 3 विकेट्स स्वस्तात गमावल्या. विजयासाठी 94 धावांच्या या माफक लक्ष्यासमोर पॉवरप्लेअखेर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या तीन गडी बाद 35 धावा होती. कर्णधार ॲलिसा हिली (04), जॉर्जिया वेयरहॅम (03) आणि एलिस पेरी (17) यांच्या विकेट लवकर पडल्या. पण बेथ मुनी (नाबाद 43) आणि ॲशले गार्डनर (12) यांच्या 43 धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाने 34 चेंडू राखून विजय मिळवला. संघाने 14.2 षटकांत चार गडी गमावून सामना काबिज केला.
पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेला खूप संघर्ष करावा लागला ज्यामध्ये नीलाक्षिका सिल्वाने नाबाद 29 धावा करत संघसाठी सर्वाधिक धावा केल्या. संपूर्ण संघ 20 षटकांत सात विकेट गमावून केवळ 93 धावा करू शकला. श्रीलंकेच्या संपूर्ण डावात केवळ चार चौकार मारले गेले. गोलंदाजीत मेगनने 12 धावांत तीन बळी घेतले.
श्रीलंकेचा संघ सातव्या षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात 25 धावांवर झुंजत होता. 10 षटकांनंतर त्यांची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 43 धावा होती. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियन संघाने 13 अतिरिक्त चेंडूही टाकले, ज्यात पाच नो-बॉलचा समावेश होता. तरी देखील संघ विशेष कामगीरी करू शकला नाही. श्रीलंकेचा या स्पर्धेतील हा दुसरा पराभव आहे. यापूर्वी गुरुवारी पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
हेही वाचा-
१बाबर आझमनंतर पाकिस्तानचा कर्णधार कोण? काही स्टार खेळाडूंची नावं चर्चेत
२IND vs BAN; “भारताला पराभूत करण्यात आम्ही…” टी20 मालिकेपू्र्वीच बांगलादेशच्या खेळाडूचे मोठे वक्तव्य!
३IND vs BAN; टी20 मालिकेपूर्वी भारताला मोठा झटका! ‘हा’ स्टार खेळाडू बाहेर