क्रिकेटच्या मैदानात अनेकदा खेळाडूंमधील वाद पाहायला मिळाले आहेत. अनेकदा दोन विरोधी संघाचे खेळाडू किरकोळ कराणांमुळे लाईव्ह सामन्यात एकमेकांना उलट उत्तरे देतानाही दिसले आहेत. असे असले तरी, काही वेळा क्रिकेटच्या मैदानात दोन वेगवेगळ्या संघांतील खेळाडूंकडून खेळाडू वृत्तीचे प्रदर्शन देखील होते. काही खेळाडू मैदानात असा काही आदर्श घालून देता, जो पुढचे अनेक वर्ष लक्षात राहतो. एसेच काहीसे काम वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कोसटी सामन्यात स्टीव स्मिथ याने केले.
वेस्ट इंडीज संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना एडिलेटमध्ये पार पडला. शुक्रवारी (19 डिसेंबर) ऑस्ट्रेलियन संघाने या सामन्यात 10 विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यातील शेवटच्या दिवसी म्हणजेच शुक्रवारी स्टीव स्मिथ (Steve Smith) याचा एक व्हिडिओ समोर आला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत स्मिथ वेस्ट इंडीजच्या शमर जोसेफ (Shamar Joseph) याच्या शुजची लेस बांधताना दिसत आहे.
शमर जोसेफ याच्यासाठी हा कसोटी क्रिकेटमधील पदार्पणाचा सामना होता. त्याने कसोटी कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर स्टीव स्मिथ याला शिकार बनवले होते. जोसेफने पहिल्या डावात स्मिथला अवघ्या 12 धावांवर झेलबाद केले होते. असे असले तरी, दुसऱ्या डावात वेस्ट इंडीज संघ फलंदाजी करत असताना स्टीव स्मिथनेच जोसेफच्या शुजची लेस बांधली. जोसेफला शुजची लेस सुटल्यामुळे खेळपट्टीवर धावता येत नव्हते. तसेच पायात घातलेल्या पॅटमुळे खाली वाकून तो ही लेस बांधू देखील शकत नव्हता. जोसेफची झालेली अडचण पाहताच स्मिथ त्याच्या मदतीसाठी धावला. स्मिथ जोसेफच्या शुजची लेस बांधतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून चाहत्यांकडून स्मितचे तोंड भरून कौतुक केले जात आहे.
Thanks mate! Steve Smith gives Shamar Joseph a hand with his laces 🤝#SpiritOfCricket #AUSvWI pic.twitter.com/HQEzKi6Fl8
— cricket.com.au (@cricketcomau) January 19, 2024
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात वेस्ट इंडीजने 188, तर दुसऱ्या डावात 120 धावांवर सर्व विके्टस गमावल्या. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात 283 धावा करून बाद झाला. तर दुसऱ्या डावात अवघ्या 6.4 षटकात ऑस्ट्रेलियाने 26 धावांचे लक्ष्य गाठले. शमर जोसेफ याने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यातील पहिल्या डावात विकेट्सचे पंचक नावावर केले. पदार्पणाच्या सामन्यात तो वेस्ट इंडीजला विजय मिळवून देऊ शकला नाही. पण हे प्रदर्शन नक्कीच आढवणीत राहण्यासारखे आहे. दुसरीकडे स्मिथ पहिल्या डावात 12 दुसऱ्या डावात 11* धावांवर बाद झाला. (AUS vs WI 2nd Test । Steve Smith gives Shamar Joseph a hand with his laces)
महत्वाच्या बातम्या –
कसोटी क्रिकेट वाचवायचंय तर ‘हा’ उपाय करा! इंग्लिश दिग्गजाचा मोठ्या क्रिकेट बोर्डांना सल्ला
NZ vs PAK : बाबर-रिजवानची सलामी जोडी फोडल्याने भडकला दिग्गज, बाबरचे समर्थन करण्याबाबत मोठे विधान